कसोटी क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा जास्त बळी घेणारा इग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन हा भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना भारतीय फलंदाजांना सर्वाधिक नडला होता. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत असे फलंदाजही गार पडले. परंतु पहिल्या कसोटीत इतकी चांगली कामगिरी केली असली, तरी इग्लंडच्या या गोलंदाजाला येत्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागू शकते. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्वरवूड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना सिल्वरवुड यांनी सांगिलते की, “अंडरसन पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो चांगली गोलंदाजी देखील करताना दिसत आहे. आपल्या खेळावर सुद्धा त्याने कठोर मेहनत घेतली आहे. जो पर्यंत तो तंदुरुस्त आणि निरोगी आहे व दमदार गोलंदाजी करेल तोपर्यंत तो खेळू शकेल. वयाची ४० वर्षे पार केल्यानंतरही तो इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्त्व करताना दिसला, तरी मला आश्चर्य वाटणार नाही.”
पुढे ते म्हणतात की, “अंडरसनला बाहेर ठेवून संघात बदल करणे मला जमणार नाही. परंतु उन्हाळा आणि वातावरणातील आर्द्रता या दरम्यान गोलंदाजांना ताजेतवाने ठेवण्यासाठी बदली करणे हाच योग्य पर्याय आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.”
दुसरीकडे अंडरसनच्या मते, “फलंदाज ज्यावेळी एका लयमध्ये असतो तेव्हा त्याला सतत फलंदाजी करायची असते. असेच काहीसे गोलंदाजांच्या बाबतीत देखील होते. आम्हाला हा खेळ सलग चार महिने खेळायचा आहे. त्यासाठी शरीराला आराम देणे हीदेखील एक महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मला दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती मिळाली तरी हरकत नाही.”
अंडरसनच्या नावे कसोटीत ६०० हून अधिक बळी
३८ वर्षीय जेम्स अंडरसनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा जास्त बळींची नोंद आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने आतापर्यंत १५८ सामने खेळले आहेत. यात त्याने ६११ बळींचा टप्पा गाठला असून एका डावात ५ गडी बाद करण्याची कामगिरी ३० वेळा केली आहे. तसेच एका सामन्यात १० गडी बाद करण्याची किमया ३ वेळा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? जाणून घ्या खरं काय ते
भारतीय संघासाठी खुशखबर! अक्षर पटेल दुसऱ्या कसोटीसाठी झाला फिट, ‘या’ खेळाडूची घेऊ शकतो जागा
“कुलदीप दुसऱ्या देशाकडून खेळला असता तर त्याने आत्तापर्यंत किमान २०० विकेट्स घेतल्या असत्या”