भारत विरुद्ध इंग्लंड संघांमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून आयोजित केली जाईल. या कसोटी मालिकेसह, भारतीय संघ 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) आपला प्रवास सुरू करेल. ही मालिका सुरू होण्यापूर्वी, भारत अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध तीन सामने खेळेल. हे सामने प्रत्येकी चार दिवसांचे असतील. हे सामने आयपीएल संपल्यानंतर लगेच खेळवले जातील. भारतीय संघाविरुद्ध संघाला पुन्हा फॉर्म मिळवता यावा यासाठी हे सामने देखील आयोजित केले जातील.
मागील 2024 हे वर्ष टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी काही खास नव्हते. भारतीय चाहत्यांना आशा होती की टीम इंडिया 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. परंतु 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 असा पराभव झाल्यामुळे टीम इंडियाला WTC अंतिम सामन्याला पात्र ठरता आले नाही. टीम इंडियाला WTC फायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही अशी ही पहिलीच वेळ होती. या दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजीने खूप निराशा केली.
इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्यांदरम्यान, दोन्ही संघ तरुण खेळाडूंवरही लक्ष केंद्रित करतील. जेणेकरून मुख्य मालिका सुरू होण्यापूर्वी या खेळाडूंना राष्ट्रीय संघासाठी तयार करता येईल. संघ व्यवस्थापन देखील आता पुढील WTC 2025-27 चा विचार करुन संघाची निवड केली जाईल. अश्या परिस्थितीत संघातील वरिष्ठ खेळाडूंना स्थान मिळणार का? हे पाहणे रंजक ठरेल. याशिवाय नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत रोहित शर्माने पुढील कर्णधार निवडीसाठी मॅनेजमेंटला होकार दिला आहे.
हेही वाचा-
नितीश कुमार रेड्डीचं नशीब चमकलं, मुख्यमंत्र्यांकडून मिळालं लाखोंचं बक्षीस
BCCI; नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूंवर होणार कडक कारवाई, पाहा काय आहे शिक्षा
दारुड्यांच्या हुल्लडबाजीमुळे थांबवली मॅच, नंतर सामन्याची जागाच बदलली!