क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड आणि भारत या संघामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत यजमानांना १५१ धावांनी पराभूत केले. यासह भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या विजयाबद्दल भारतीय संघाचे सगळीकडे कौतुक होत असतानाच इंग्लंड संघावर त्यांच्याच देशाचे माजी खेळाडू बरसत आहेत.
इंग्लंड हा पराभव विसरणार नाही
इंग्लंडचा माजी कर्णधार ऍण्ड्रू स्ट्रॉस याने लॉर्ड्स कसोटीनंतर प्रसारण वाहिनीशी बोलताना म्हटले,
“इंग्लंड विजयाच्या अगदी जवळ होता. मात्र, शेवटच्या दिवशी लंचपूर्वी सामना त्यांच्या पकडीतून सुटला. इंग्लंडची वरची फळी पुन्हा कोसळल्याने मधल्या फळीवर दबाव आल. भारताकडे इंग्लंडला बाद करण्यासाठी पुरेशी षटके होती.”
या पराभवाबाबत बोलताना स्ट्रॉस पुढे म्हणाला,
“डॉम सिब्ली अजिबात फॉर्ममध्ये नाही. हमीद काहीसा दबलेला वाटतोय. ओली पोपला लवकरात लवकर संघात पाचारण करायला हवे. मात्र, त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे उचित ठरेल का हे पाहावे लागेल. इंग्लंड हा पराभव विसरणार नाही व त्याचा परिणाम पुढील सामन्यांमध्येही दिसून येईल.”
स्ट्रॉसप्रमाणे इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट व मायकेल वॉन यांनीदेखील इंग्लंड संघावर निशाना साधला आहे.
हेडिंग्लेमध्ये असेल पुढील सामना
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात खेळला गेलेला मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिलेला. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यानंतर, आता मालिकेचा तिसरा सामना हेडिंग्ले ओव्हलच्या मैदानावर २५ ऑगस्टपासून खेळला जाईल. भारत या सामन्यामध्ये विजय मिळवून प्रथमच इंग्लंडमध्ये एकापेक्षा जास्त कसोटी जिंकण्याचा पराक्रम करू शकतो. दुसरीकडे, इंग्लंड हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/21-years-ago-england-vs-west-indies-test-end-in-two-days/
हेडिंग्लेवर ५४ वर्षांपासून अपराजित राहिलाय भारत, ‘विराट आणि कंपनी’ कायम ठेवू शकेल हा विक्रम?






