---Advertisement---

जबरदस्त! इंग्लंडच्या सलामीवीरने जोखीम घेत स्टंपजवळून मारला भन्नाट शॉट अन् चेंडू सीमारेषेपार

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 3:37 PM
---Advertisement---

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बुधवारी (१४ जुलै) खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी होती. परंतु या सामन्यात इंग्लंड महिला संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंड संघाकडून डॅनीयल वॅटने नाबाद ८९ धावांची खेळी करत भारतीय संघाकडून सामना खेचून घेतला होता. परंतु तिच्या खेळीपेक्षा जास्त टॅमी ब्युमोटने खेळलेल्या एका शॉटची सध्या चर्चा आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात झालेल्या सामन्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ब्युमोटने खेळलेला एक शॉट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.  (England opener Tammy Beaumont hits a superb boundery)

ब्युमोटने खेळला आगळा वेगळा शॉट
तर झाले असे की, तिसरे षटक टाकण्यासाठी पुनम यादव गोलंदाजीला आली होती. या षटकातील शेवटच्या चेंडूवर ब्युमोटने आकर्षक शॉट खेळला. पूनम यादवने चेंडू टाकतच ब्युमोट यष्टीच्या मागे चालली गेली होती. हा आकर्षक शॉट तिने जोखीम गेत यष्टीच्या अगदी सरळ रेषेत थांबून मिड विकेटच्या दिशेने खेळला. तो चेंडू अडवण्यासाठी शेफाली वर्मा चेंडूच्या मागे धावली, परंतु तिला चेंडू अडवण्यात यश आले नाही. इंग्लंडच्या चाहत्यांनी या शॉटचे तोंडभरून कौतुक केले आहे. परंतु ब्युमोट मोठी खेळी खेळू शकली नाही. ती १५ चेंडूंमध्ये ११ धावा करत माघारी परतली.

भारतीय संघाला १५३ धावा करण्यात आले होते यश
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून स्म्रिती मंधानाने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान तिने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने ३६ धावांचे योगदान दिले होते. स्म्रिती मंधाना आणि हरमनप्रीत या दोघांनी मिळून तिसऱ्या गडीसाठी ६८ धावांची भागीदारी केली होती. २० षटक अखेर भारतीय महिला संघाला ६ बाद १५३ धावा करण्यात यश आले होते.

इंग्लंड संघाने ८ गडी राखून मिळवला विजय
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून स्म्रिती मंधानाने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान तिने ८ चौकार आणि २ षटकार लगावले होते. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने ३६ धावांचे योगदान दिले होते. स्म्रिती मंधाना आणि हरमनप्रीत या दोघांनी मिळून तिसऱ्या गडीसाठी ६८ धावांची भागीदारी केली होती. २० षटक अखेर भारतीय महिला संघाला ६ बाद १५३ धावा करण्यात यश आले होते.

महत्वाच्या बातम्या –

क्रिकेटचा वारसा लाभलेल्या ‘या’ बड्या क्रिकेटरने नवव्या क्रमांकावर झळकावलीत २ शतके 

बिग ब्रेकिंग! वनडे सिरीज तोंडावर असताना श्रीलंकेला दुहेरी धक्का, परेरासह ‘हा’ खेळाडूही संघाबाहेर

कोरोना पॉझिटिव्ह रिषभवर टीकेची झोड, बीसीसीआय अध्यक्षाचा बचावासाठी पुढाकार; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---