श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मार्क वुड कोपऱ्याच्या दुखापतीमुळे यावर्षी पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याचं पुनरागमन आता थेट 2025 मध्ये होणार आहे.
वुडच्या अनुपस्थितीची भरपाई करणं इंग्लंडसाठी सोपं नसेल. इंग्लंडला यावर्षी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या 37 वर्षीय वेगवान गोलंदाजानं इंग्लंडसाठी 37 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 34 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्यानं अनुक्रमे 119, 77 आणि 77 बळी घेतले आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मार्क वुडला उजव्या मांडीला दुखापत झाली होती. या समस्येमुळे तो कसोटीतून बाहेर पडला होता. यानंतर वुडच्या कोपऱ्याच्या सांध्यामध्ये अस्वस्थता जाणवली. जेव्हा त्याचं कोपर स्कॅन करण्यात आलं, तेव्हा समजलं की त्याला पूर्ण बरं होण्यासाठी अनेक महिने लागतील.
इंग्लंड क्रिकेट बोर्डानं एका निवेदनात म्हटलं आहे की, मार्क वुड पुढील वर्षी संघात परत येईल अशी अपेक्षा आहे. इंग्लंडला पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारतात मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.
दुखापतीमुळे इंग्लंड संघातून बाहेर पडल्यानंतर मार्क वुडनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. वुडनं इंस्टाग्रामवर लिहिलं की, “ही अतिशय वाईट बातमी आहे. माझ्या उजव्या कोपऱ्यात आधीच वेदना होत्या. नियमित तपासणी दरम्यान माझ्या कोपरात ताण असल्याचं आढळलं. मला विश्रांती आणि तयारीसाठी वेळ हवा असल्यानं मी या वर्षातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मला आशा आहे की मी 2025 च्या सुरुवातीला पुनरागमन करू शकेन. मला माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो. माझ्यासाठी यापेक्षा चांगली भावना असूच शकत नाही.”
हेही वाचा –
केएल राहुलला झालं तरी काय? दुलीप ट्रॉफीतही सूर गवसेना, कसोटी संघातील स्थान डळमळीत
बाबर आझमच्या कर्णधारपदावर धोका, लवकरच हकालपट्टी होणार! हा खेळाडू मोठा दावेदार
“टायगर अभी जिंदा है…”, UP T20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमारची खतरनाक गोलंदाजी, फलंदाजांना काहीच सुचेना!