विश्वचषक 2023 स्पर्धेत 40 वा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे खेळला जात आहे. या सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने आले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने शानदार फलंदाजी केली. डेव्हिड मलान याने झळकावलेल्या अर्धशतकानंतर बेन स्टोक्स याने ठोकलेले शतक व ख्रिस वोक्स याच्या अर्धशतकामुळे इंग्लंडने 339 धावा उभारल्या.
Stokes 108 (84).
Malan 87 (74).
Woakes 51 (45).England post 339/10 against Netherlands – Champions Trophy qualification on the line for England. pic.twitter.com/iEWKG6LGfl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 8, 2023
यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या या दोन्ही संघांमधील हा सामना गुणतालिकेच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नव्हता. या सामन्यात इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. जॉनी बेअरस्टो केवळ 15 धावांमध्ये माघारी परतल्यानंतर जो रूट व डेव्हिड मलान यांनी मोठी भागीदारी रचत डाव सावरला. रूट 28 धावा करून बाद झाल्यानंतर मलानही आक्रमक 87 धावा केल्यानंतर धावबाद झाला. त्यानंतर हॅरी ब्रुक, कर्णधार जोस बटलर व मोईन अली स्वस्तात परतले.
त्यानंतर बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स यांनी सावध पवित्रा घेतला. त्यांनी हळूहळू डाव पुढे नेला. खराब चेंडूंचा समाचार घेत स्टोक्सने स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने केवळ 78 चेंडूंमध्ये विश्वचषकातील आपले पहिले शतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने वोक्सने देखील अर्धशतक करत संघाला 300 पार नेले. स्टोक्सने बाद होण्यापूर्वी 6 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. नेदरलँड्ससाठी बास डी लिडे याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
(England Post 339 Runs Against Netherlands Ben Stokes Hits Century Woakes Malan Fifty)
हेही वाचा-
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’
ODI Rankings: 24 वर्षीय शुबमन बनला जगातील नंबर 1 फलंदाज, बाबरची बादशाहत संपुष्टात