इंग्लंड क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी नेदरलँड दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आम्सटलवेलच्या वीआरए क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. इंग्लंड संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि विक्रमी धावसंख्या उभी केली.
नेदरलँड संघाचा कर्णधार पीटर सीलारने या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु इंग्लंडच्या दमदार फलंदाजांनी त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. इंग्लंड एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करणारा संघ बनला आहे. त्यांनी या सामन्यातील ५० षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर ४९८ धावा केल्या. इंग्लंड ५०० धावा करणारा पहिला संघ बनला असता, पण अवघ्या २ धावा कमी पडल्यामुळे हा विक्रम घडला नाही.
इंग्लंडच्या पहिल्या तीन खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले. सलामीवीर जेसन रॉय अवघी एक धावा करून बाद झाला. पण फिलिप सॉल्ट (Phil Salt), डेविड मलान (Dawid Malan), आणि जोस बटलर (Jos Buttler) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ही विक्रमी धावसंख्या उभी केली. सलामीसाठी आलेल्या फिलिप सॉल्टने ९३ चेंडूत १२२ धावा केल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या मलानने १०९ चेंडूत १२५ धावा केल्या.
आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या जोस बटलरने या सामन्यात कमालच केली. अवघ्या ४६ चेंडूत बटलरने शतक ठोकले. सामन्यात तो एकूण ७० चेंडू खेळला, ज्यामध्ये १४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १६२ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त लियाम लिविंगस्टोनने देखील ताबडतोड फलंदाजी केली. लिविगस्टोनने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक ठोकले, जे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने एकूण २२ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या.
इंग्लंडशिवाय इतर कोणत्याच संघाने नाही केल्या ४५० पेक्षा जास्त धावा
यापूर्वी विश्वविजेत्या इंग्लंडनेच एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोदी धावसंख्या केली होती. २०१८ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ विकेट्सच्या नुकसानावर ४८१ धावा केल्या होत्या. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसरा सर्वात मोठी धावसंख्या करणारा संघ देखील इंग्लंडच आहे. त्यांनी २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३ विकेट्सच्या नुकसानावर ४४४ धावा केल्या होत्या. २००६ मध्ये श्रीलंका संघाने नेदरलँडविरुद्ध ४४३ धावा केल्या होत्या आणि त्यांचा संघ या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा दक्षिण आफ्रिकेचचं नाणं खणकलं, धाकड फलंदाजाचेही पुनरागमन; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग Xi
पुणेकर ऋतुराज गायकवाडने उडवली युझवेंद्र चहलची खिल्ली, पाहा व्हिडीओ
चौथ्या सामन्यात भारताला ‘या’ गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार, वाचा काय आहेत संघातील कमतरता