इंग्लंड संघाचा (england cricket team) सलामीवीर फलंदाज जेसन रॉय (jason roy) याच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील झाला आहे. रॉय दुसऱ्यांदा वडील बनला आहे. त्याची पत्नी एली मुरे (elle moore) हिने एका सुंदर अशा मुलीला जन्म दिला आहे. रॉय त्याच्या आयुष्यात आलेल्या या दुसऱ्या मुलीमुळे खूप आनंदी आहे. त्याने स्वतःच्या इंस्टाग्रामवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली.
रॉयने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्रमा खात्यावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चाहत्यांना ही आनंदाची बातमी समजली. या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याने संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याची पत्नी एली मुरेने या नवजात बाळाला ५ जानेवारीला जन्म दिला आहे. मात्र, रॉयने ही बातमी ८ जानेवारीला चाहत्यांसोबत शेअर केली.
इंस्टाग्रमावर केलल्या पोस्टमध्ये रॉयने तीन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोंमध्ये तो पत्नी एलीसोबत असून, हातात नवजात बाळ आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोत त्याची मोठी मुलगी तिच्या लहान बहीनीचे चुंबन घेताना दिसत आहे. शेवटच्या फोटोत रॉयची मोठी मुलगी आणि नुकतीच जन्मलेली मुलगी एकत्र झोपलेले दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CYbKjOto6-E/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, ३१ वर्षीय जेसन रॉयने २०१७ साली त्याची प्रेयसी एलीसोबत विवाह केला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षींनी म्हणजेच २०१९ मध्ये एली आणि रॉयची जोडी पहिल्यांदाज आई-वडील बनले. त्यावेळी त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता आणि तिचे नावर एवर्ली असे ठेवले. त्याच वर्षी एवर्ली आजारी पडली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. असे असले, तरी रॉयला मात्र स्वतःची मुलगी आजारी असताना तिच्यासोबत जास्त वेळ थांबता आले नाही.
मोठी मुलगी आजारी असताना रॉयने तिच्यासोबत रुग्णालयात थोडा वेळ घालवला आणि इंग्लंड संघाच्या ताफ्यात सामील झाला. त्यावेळी इंग्लंड आणि पाकिस्तान असा सामना झाला होता. सामना खेळण्यापूर्वी रॉयला आरामदेखील करता आला नव्हता. तरीही त्याने या सामन्यात शतकी खेळी केली होती. सामना संपल्यानंतर तो पुन्हा मुलीजवळ रुग्णालयात पोहोचलेला.
महत्वाच्या बातम्या –
दुसरी कसोटी गमावल्यानंतर भारतीय क्रिकेटरला आठवला रहाणे; म्हणाला, ‘राहुलऐवजी त्याला कर्णधार…’
इंग्लंडचा गोलंदाज हॅट्रिकवर असताना ऑस्ट्रेलियाने केला डाव घोषित, सिडनी कसोटीवर यजमानांचे वर्चस्व
खुद्द ब्रँड अँबेसेडर अमिताभ यांनाही मिळाली चुकीची माहिती, ‘या’ लीगमध्ये सहभागी नाही होणार सचिन
व्हिडिओ पाहा –