---Advertisement---

इंग्लंडच्या कठीण दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला ‘अशाप्रकारे’ करावी लागेल कोरोना चाचणी

On: रविवार, मे 16, 2021 12:14 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्‍याची पूर्ण योजना तयार केली आहे. इंग्लंड दौर्‍यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआय सर्व खेळाडूंसाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी घरीच कोरोना टेस्ट करण्याची योजना आखत आहे.

सूत्रांनी सांगितले की, 19 मे रोजी भारतीय संघाचे खेळाडू मुंबईत जमण्यापूर्वी तीन वेळा आरटी-पीसीआर चाचणी करतील. घरातच खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. 2 जून रोजी इंग्लंडला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतीय संघाच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. खेळाडूंना दुसरा डोस इंग्लंड येथे दिला जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी, खेळाडूंच्या लसीकरणाबद्दल बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की ‘भारत सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकासाठी लसीकरण सुरू केले आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू भारतातच कोरोना लसीचा पहिला डोस घेऊ शकतात. बीसीसीआय दुसर्‍या डोसच्या संदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी संपर्कात आहे. आमचा प्रयत्न असेल की खेळाडूंना इंग्लंडमध्येच कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात यावा. जर इंग्लडच्या सरकारने परवानगी दिली नाही तर आम्ही कोरोना लसीचा दुसरा डोस भारतातूनच घेऊन जावू.’

आगामी 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे होणार आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौर्‍यासाठी बीसीसीआयने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असेल.

तसेच रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारीचे संघात पुनरागमन झाले आहे. निवड समितीने अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नागवासवाला यांनाही राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरच संघासोबत इंग्लंडला जातील.

महत्त्वाच्या बातम्या –

आता क्रिकेटमध्ये ‘बायो-बबल’ ऐवजी वापरला जाणार ‘हा’ शब्द?

सेहवाग म्हणतो भारताच्या ‘या’ खेळाडूमध्ये दिसते युवा कायरन पोलार्डची झलक

“शोएब अख्तरने मला धमकी दिलेली”, रॉबिन उथप्पाने केला खळबळजनक दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---