इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस 2023चा पहिला सामना मंगळवारी (20 जून) निकाली निघाला असता. पण मंगळवारीच ऐन वेळी पावसामने मैदानात हजेरी रावली. याच कारणास्तव पाचव्या दिवसाचे पहिले सत्र रद्द करावे लागले. ऑस्ट्रेलियन संघ सामना जिंकण्यासाठी प्रवळ दावेदार होता. मात्र, पावसामुळे ही शक्यता आता कमी झाली आहे.
ऍशेस 2023 (Ashes 2023) हंगामाची सुरुवात होण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये या ऐतिहासिक मालिकेसाठी उत्सुकता पाहयला मिळत होती. पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ एकमेकांच्या तोडीस तोड प्रदर्शन करताना दिसले. शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 281 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने तीन बाद 107 धावा केल्या आहेत. राहिलेल्या 174 धावा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे संपूर्ण दिवस होता. पण पावसामुळे पाहुण्या संघाचा चांगलाच खोळंबा झाला.
माहितीनुसार पहिले सत्र संपेपर्यंत मैदान खेळण्यायोग्य गोण्याची कुठलीच शक्यता नाही. याच कारणास्तव निर्णायक दिवसाचे पहिले सत्रच रद्द केले गेले. ऑस्ट्रेलियन संघाच्या हातात अजून 7 विकेट्स आहेत आणि 174 धावा हे लक्ष्य त्यांच्यासाठी जास्त मोठे देखील नव्हते. असात पावसामुळे नुकसान हे ऑस्ट्रेलियन संघाचे होताना दिसते. आता संघाला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या दोन सत्रांमध्येच 174 धावा कराव्या लागतील.
उभय संघांतील या सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि 8 बाद 393 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 386 धावा केल्या आणि संघ 7 धावांनी पिछाडीवर होता. दुसर्या डावात इंग्लंड संघ 273 धावांवर सर्वबाद झाला. विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 281 धावांचे लक्ष्य मिळाले. पहिल्या डावात इंग्लंडसाठी जो रुट याने 112, तर ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा याने 141 धावांची खेळी केली होती. गोलंदाजांचा विचार केला, तर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या नेथन लायनने पहिल्या डावात 3, तर दुसर्या डावात 4 विकेट्स घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्स देखील दुशर्या डावात 4 विकेट्स घेऊ शकला. इंग्लंडसाठी स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली रॉबिन्सन यांनी पहिल्या डावात प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या 22 वर्षीय युवा खेळाडूला पंतच्या बॅटिंग स्टाईलची भुरळ; म्हणाला, ‘मलाही रिषभसारखं…’
ICC Rules : वनडे अन् टी20मधील पॉवरप्ले, कधी झाले बदल आणि काय होता बॅटिंग Powerplay नियम? वाचा