भारत आणि इंग्लंड संघांमधील 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (12 ऑगस्ट) लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. मालिकेतील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
दोन्ही संघामध्ये होणार बदल
सध्या भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांना खेळाडूंच्या दुखापतीची चिंता सतावत आहे. लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी इशांत शर्माला भारताच्या 11 जणांच्या संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
तसेच इंग्लंड संघालाही मोठा धक्का या कसोटीपूर्वी बसला आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेतूनच बाहेर पडला आहे. तसेच जेम्स अँडरसनलाही छोटी दुखापत असल्याने त्याच्याही लॉर्ड्स कसोटीतील सहभागावर प्रश्नचिन्ह आहे.
लॉर्ड्सवर होणाऱ्या या सामन्याबद्दल सर्वकाही…
1. भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना12 ते 15 ऑगस्टदरम्यान खेळला जाईल.
2. भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा कसोटी सामना कुठे खेळला जाईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.
3. भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा कसोटी सामना किती वाजता खेळला जाईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळला जाईल.
4. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक कोणत्या वेळी होईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात 12 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
5. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकतो?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतो. तसेच SonyLiv ऍपवरही सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहाता येईल.
यातून निवडले जातील 11 जणांचे संघ
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.
इंग्लंड संघ: जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, मोईन अली, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रोली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डोम सिबली, मार्क वुड.
महत्त्वाच्या बातम्या –
नीरज चोप्राच्या सन्मानार्थ मोठी घोषणा; ‘या’ दिवशी दरवर्षी साजरा होणार ‘भालाफेक दिवस’
आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामापूर्वी शुभमन गिलने बदलला आपला पूर्ण लूक, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल