---Advertisement---

अद्भुत, अविश्वसनीय! जॉनी बेयरस्टोने घेतला एकहाती अप्रतिम कॅच; पाहा व्हिडिओ

---Advertisement---

सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लीड्सच्या हेडींग्ले मैदानात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोहलीचा हा निर्णय चुकल्याचे लवकरच कळून आले. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. अनेक खेळाडू आपल्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या खेळाने लक्ष वेधून घेत आहेत. अशाच एका उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी १९ व्या षटकात पाहायला मिळाला.

भारताच्या दुसऱ्या डावातील १९ व्या षटकात इंग्लंडचा क्रेग ओव्हरटन गोलंदाजीसाठी आला होता. त्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ओव्हरटनने ८ धावांवर खेळत असलेल्या केएल राहुलला उत्कृष्ट गोलंदाजी करत तंबूत माघारी पाठवले. ओव्हरटनच्या या चेंडूने राहुलच्या बॅटची कड घेतली. यानंतर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या जॉनी बेरस्टोने एका हातात अद्भुत असा झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

दरम्यान, पहिल्या डावात इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर चांगलेच वर्चस्व राखत भारतीय संघाला ७८ धावांवर गुंडाळले. नंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी देखील भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. पहिल्या डावात इंग्लंडने ४३२ धावा केल्या ज्यामुळे इंग्लंड ला ३५४ धावांची चांगली आघाडी मिळाली.

तसेच भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी ला ४ विकेट मिळाल्या. तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.

भारतीय संघाचे जोरदार पुनरागमन
इंग्लंड संघाने ३५४ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन करणे कठीण झाले होते. दरम्यान, केएल राहुल देखील अवघ्या ८ धावा बाद करून माघारी परतला होता. परंतु त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी भागीदारी करत डाव सावरला. परंतु चांगली सुरुवात मिळाल्यानंतर रोहित शर्माला मोठी खेळी साकारता आली नाही. तो ५९ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला.

नंतर पुजाराला कर्णधार विराट कोहलीने साथ देत डाव पुढे नेला. त्यांनी तिसऱ्या दिवसाखेर नाबाद ९९ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाखेर भारताने २ बाद २१५ धावा केल्या. विराट ४५, तर पुजारा ९१ धावांवर नाबाद आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या –
भारीच! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित शर्मा ठरला केवळ तिसराच भारतीय सलामीवीर
टोकियो ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकावरील थर उतरतोय? चीनी खेळाडूचा खबळजनक खुलासा
परदेशात कधी येणार हिटमॅनचे शतक? रोहितने नको असलेल्या यादीत गाठले चौथे स्थान

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---