---Advertisement---

पुरुष क्रिकेटर्सने भरलेल्या बसमध्येच महिला क्रिकेटपटूने नाईलाजाने केली होती लघुशंका

---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघासाठी २००५ हे वर्ष खूपच खास होते. हीच ती वेळ होती जेव्हा इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संंघाने ऍशेस मालिकेवर आपले नाव कोरले होते. महिला संघासाठी तर हा विजय खूपच खास होता. कारण तब्बल ४२ वर्षांनंतर त्यांनी ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. या विजयाचा आनंद वेगळ्याच अंदाजात साजरा केला होता.

लंडनच्या रस्त्यांवर महिला आणि पुरुष संघाची ओपन बस फिरत होती. ज्यामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु होती. तसेच खेळाडू बियर आणि शँपेन पिऊन आनंद व्यक्त करत होते. तरीही या दरम्यान एक अशी घटना घडली होती जिचा खुलासा १५ वर्षांनंतर झाला आहे.

ब्रिटीश वृत्तपत्र ‘द सन’च्या वृत्तानुसार, २००५मध्ये ऍशेसच्या विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान इंग्लंडची महिला क्रिकेटपटू ईशा गुहाने (Isa Guha) बसमध्येच लघुशंका केली होती. ईशाने स्वत: एका पॉडकास्टदरम्यान याबद्दल खुलासा केला होता.

ती म्हणाली होती की, “त्या दिवशी ते सेलिब्रेशन एका रॉक कॉन्सर्टप्रमाणे वाटत होते. रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती. लोक आपल्या घराच्या छतावर आणि खिडक्यांवर आमचे नाव घेत होते. आम्ही खूप पार्टी करत होतो.”

ईशा पुढे म्हणाली की, “या दरम्यान आम्ही शँपेन पीत होतो. हे सर्व करून आम्हाला एक तास झाला होता. परंतु तेव्हाच मला वॉशरूमला जायचे होते. मी नियंत्रित करू शकले नाही. मी पाहिले की, केविन पीटरसन (Kevin Pietersen) बस थांबवून जवळच्या एका दुकानामध्ये वॉशरूमला गेला होता. परंतु मला तसे करता आले नाही. मला सांगण्यात आले की, तुला ट्राफाल्गर स्क्वायरपर्यंत वाट पहावी लागेल. ते ठिकाण येण्यासाठी २० ते ३० मिनिटं लागणार होती.”

“माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. मी त्यावेळी बसच्या छतावरून खाली गेले आणि तेव्हा तिथे कोणीही नव्हते. मी एक कप घेतला आणि त्यामध्येच लघुशंका केली होती. यानंतर मी पुन्हा सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली,” असेही ईशा पुढे म्हणाली.

ईशा गुहा भारतीय मुळ असणारी क्रिकेटपटू आहे. ती इंग्लंडच्या महिला संघाकडून खेळणारी पहिली ब्रिटीश आशियाई खेळाडू आहे. तिने २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या ती समालोचन करते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---