भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 22 जानेवारीला पहिल्या टी20 ने होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत, जाणून घ्या पहिल्या टी20 मध्ये इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते.
फिरकी अष्टपैलू विल जॅक भारताविरुद्धच्या टी20 मालिकेत दिसणार नाही. मात्र, संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. जोस बटलर संघाचे नेतृत्व करेल. टी20 मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात दोन फलंदाज, पाच अष्टपैलू, तीन यष्टिरक्षक आणि पाच गोलंदाजांचा समावेश आहे.
पहिल्या टी20 मध्ये इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास, बेन डकेट आणि फिल सॉल्ट डावाची सुरुवात करू शकतात. कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर जेकब बिथेल चौथ्या क्रमांकावर, हॅरी ब्रूक पाचव्या क्रमांकावर आणि लियाम लिव्हिंगस्टोन सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसेल.
यानंतर दोन गोलंदाजी अष्टपैलू जेमी ओव्हरटन आणि जोफ्रा आर्चर दिसू शकतात. यानंतर गोलंदाजीत गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि आदिल रशीद खेळण्यची शक्यता आहे. अशाप्रकारे इंग्लंडचा संघ पाच विशेषज्ञ गोलंदाज आणि सहा विशेषज्ञ फलंदाजांसह मैदानात उतरू शकतो.
भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जेकब बिथेल, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि गस ऍटकिन्सन
भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक
22 जानेवारी- पहिली टी20, कोलकाता (सायंकाळी 7 वाजता)
25 जानेवारी – दुसरी टी20, चेन्नई (सायंकाळी 7 वाजता)
28 जानेवारी- तिसरी टी20, राजकोट (सायंकाळी 7 वाजता)
31 जानेवारी- चाैथी टी20, पुणे (सायंकाळी 7 वाजता)
2 फेब्रुवारी – पाचवी टी20, मुंबई (सायंकाळी 7 वाजता)
हेही वाचा-
भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल! निवड समितीला कठोर निर्णय घेण्याचा सल्ला
“भांडतो विराट कोहली, पण संपूर्ण टीमला भोगावं लागतंय…”, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
2024 सालचा सर्वोत्तम कसोटी संघ, 3 भारतीय आणि एका पाकिस्तानी खेळाडूचा समावेश