---Advertisement---

इंग्लिश क्रिकेटपटू टाकणार ऍशेसवर बहिष्कार? ‘हे’ आहे कारण

On: रविवार, ऑगस्ट 1, 2021 12:50 AM
---Advertisement---

क्रिकेट जगतातील सर्वात प्रतिष्ठेची द्विपक्षीय मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी ऍशेस मालिका संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ऍशेसपूर्वी काही अटी घातल्या असून, त्या पूर्ण न झाल्यास मालिकेवर बहिष्कार टाकला जाईल असे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण
इंग्लंडमधील एका प्रमुख वृत्तपत्राच्या बातमीनुसार, ‘इंग्लंड संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी ईसीबीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (सीए) कोविड प्रोटोकॉलबद्दल चेतावणी दिली आहे. जर खेळाडूंना आपल्या कुटुंबाला दौऱ्यावर नेण्याची परवानगी नसेल तर ते मालिका खेळणार नाहीत. ईसीबीदेखील या प्रकरणात खेळाडूंसोबत आहे. सीए पुढील आठवड्यात ईसीबीला प्रोटोकॉलबद्दल माहिती देऊ शकते. इंग्लिश खेळाडू हा प्रश्न उपस्थित करत आहेत कारण, भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंबासह आहेत.’

प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, “सध्या याबद्दल काहीही सांगता येणार नाही, कारण गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत. मात्र, हे नियम बदलण्याची गरज आहे.” सध्याचे नियम चालू राहिले तर, इंग्लंडचे खेळाडू जवळपास ५० वर्षांनंतर कुटुंबाशिवाय ऑस्ट्रेलियाला जातील. यापूर्वी हे १९६० मध्ये घडले होते.

या कारणाने खेळाडू आहेत चिंतेत
इंग्लिश खेळाडू चिंतित असण्याचे कारण म्हणजे, ते सध्या भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेसाठी बायो-बबलमध्ये आहेत. यानंतर संघाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करायचा आहे. तेथे संघाला वनडे आणि टी२० सामने खेळायचे आहेत. त्यानंतर पाकिस्तानमध्ये तीन टी२० सामने खेळावे लागतील.

यानंतर, संघ यूएई येथे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक खेळेल. त्यानंतर सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. ऍशेस मालिका ८ डिसेंबर रोजी सुरू होऊन १८ जानेवारीला संपेल. त्यानंतर संघाला वेस्ट इंडिजमध्ये मर्यादित षटकांच्या आणि कसोटी मालिका खेळावी लागेल. याचाच अर्थ फेब्रुवारीपर्यंत सर्व खेळाडू कुटुंबापासून दूर राहतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पुन्हा जायचे असल्यास भारतीय संघाला करावे लागेल ‘हे’ काम

‘या’ तारखेला सुरू होऊ शकतो ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’चा दुसरा हंगाम

आपल्या आजवरच्या कारकिर्दीबाबत रिषभ म्हणाला, “हा अद्भुत प्रवास”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---