इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने गमावला. ज्यानंतर भारतीय संघाला टीकेला सामोरे जावे लागले. अनेकांनी भारतीय संघाच्या खेळण्यावर भाष्यदेखील केले. यादरम्यान तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी देखील कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाला एक मोलाचा सल्ला दिला.
गावसकर यांच्या मते भारतीय संघाने लंडनमधील ओव्हलच्या मैदानात एका अतिरिक्त फलंदाजाला संधी द्यावी. याबाबत गावसकर म्हणाले होते, “माझ्या मते भारतीय संघाने त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघाबाबत विचार केला पाहिजे. त्यांनी हा विचार केले पाहिजे, की पुढील सामन्यात ५ गोलंदाजांसोबत उतरावे की, एका अतिरिक्त फलंदाजाला संधी द्यावी.”
मात्र यावर विराट कोहलीने वेगळे मत व्यक्त केले. याबाबत माध्यमांशी बोलताना कोहली म्हणाला, “मी अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा निर्णयावर विश्वास करत नाही. याच्या आधीही मला यावर विश्वास नव्हता. एकतर तुम्ही प्रयत्न करून स्वतःला हरण्यापासून वाचवू शकता, किंवा प्रयत्न करून तुम्ही सामना जिंकू शकता. याआधी इतिहासात देखील आपण अशा प्रकारे अतिरिक्त फलंदाज खेळवले होते. मात्र यामुळे अनेक सामने अनिर्णित राहिले होते.”
पुढे बोलताना कोहली म्हणाला, “आम्ही समोर असलेल्या धावफलकामुळे दबावात आलो होतो. आम्हाला माहीत होते की, ७८ वर सर्व बाद झाल्यानंतर आम्हाला ३५४ धावांच्या आघाडीचा सामना देखील करायचा होता. इंग्लंडच्या गोलंदाजांचा दबाव देखील खूप होता. ज्या ठिकाणी आम्हाला अडचण निर्माण होत होती, ते त्याच ठिकाणी गोलंदाजी करत होते.”
“पहिल्या डावात खेळपट्टी चांगली होती, मात्र इंग्लिश गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीने आम्हाला चुका करण्यास भाग पाडले. ज्यामुळे खेळाडू लवकर बाद होऊ लागले, आणि केवळ ७८ धावाच बनवू शकलो.”
“आम्हाला एका मजबूत गोलंदाजीचा सामना करावा लागला. ज्यामुळे आम्हाला धावा करण्यात अडचणी आल्या. तुम्ही म्हणू शकता की, आमच्या जवळ फलंदाजीमध्ये मजबुती नाही. मात्र सुरूवातीच्या फलंदाजांना धावा करावा लागतील. ज्यामूळे नंतरच्या फलंदाजांवर याचा दबाव येणार नाही,” असेही कोहली म्हणाला.
दरम्यान, इंग्लंड इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतावर एक डाव आणि ७६ धावांनी दमदार विजय मिळवला. ज्यामुळे मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. तसेच तिसऱ्या कसोटीच्या पराभवानंतर विराट कोहलीने संघातील बदलांबाबत देखील संकेत दिले आहेत. यानंतर चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरु होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता
–गरजू खेळाडूंना प्रारंभीच्या काळात आर्थिक मदत करा – तेजस्विनी सावंत
–डबल धमाका! पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीत दोन पदकं; देवेंद्रने जिंकले ‘रौप्य’, तर सुंदरला ‘कांस्य’