कोलकाता नाईट रायडर्स संघाला वरुण चक्रवर्ती आणि सुनिल नरेन यांच्यानंतर तिसराव मिस्ट्री स्पिनर मिळाला. गुरुवारी केकेआरने होम ग्राउंड ईढन गार्डनवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत केले. केकेआरने हा सामना तब्बल 81 धावांनी नावावर केला. 19 वर्षीय सुयश शर्मा याने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करत तीन विकेट्स घेतल्या. अशात चाहत्यांमध्ये सुयश शर्माविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
आपल्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात सुयश शर्मा (Suyesh Sharma) याने काही चेंडू असे टाकले की, जे खरोखर कौतुकास पात्र होते. गुरुवारी (6 एप्रिल) केकेआरने आयपीएल 2023 मधील त्यांचा दुसरा सामना खेळला. आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात केकेआरने मोठा विजय मिळवला. या विजयाचे श्रेय केकेआरच्या फिरकी गोलंदाजांना जाते. कारण संघातील तिन्ही फिरकी गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले. परिणामी आरसीबी संघ आपली 20 षटकेही खेळून काढू शकला नाही.
सुयशला एम्पॅक्ट प्लेअर म्हणून या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या 4 षटकात 30 धावा कर्च केल्या आणि केकेआरचा दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला. वरुण चक्रवर्तीने चार, तर सुयशने तीन विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडीजचा दिग्गज सुनील नरेन याने दोन विकेट्स घेतल्या. दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्मा 19 वर्षीय सुयशचे शिकार बनले.
Anuj Rawat ☑️
Dinesh Karthik ☑️Watch Suyash Sharma pick two quick wickets in his debut game.
Live – https://t.co/V0OS7tFZTB #TATAIPL #KKRvRCB #IPL2023 pic.twitter.com/3igG1jDWb4
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023
सुयश शर्मा दिल्लीमध्ये जूनिअर लेवलचे क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळळा. आपल्या आश्चर्यकारक फिरकी गोलंदाजीमुळे तो केकेआरच्या संघ व्यवस्थापनाच्या नजरेत आला होता. केकेआरने त्याची गुणवत्ता हेरल्यानंतर आयपीएल लिलावात त्याला बेस प्राईस 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. विशेष म्हणजे सुयशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजून एकही प्रथम श्रेणी, लिस्ट ए किंवा टी-20 सामना खेळला नाहीये. अशात केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यात मिळालेली संधी नक्कीच सुयशसाठी मोठी होती. गोलंदाजाने या संधीचा पुरेपूर फायदा घेत तीन विकेट्स घेतल्या.
दरम्यान, या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 7 बाद 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबने 17.4 षटकात 123 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. शार्दुल ठाकुर सामनावीर ठरला. केकेआरच्या सुरुवातच्या फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्यानंतर शार्दुलने सातव्या क्रमांकावर येऊन तावडतोड फलंदाजी केली. अवघ्या 29 चेंडूत शार्दुलने 68 धावा कुटल्या. (Entry into IPL without playing domestic? Suyesh Sharma got a big success in the first match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीचे नशीब पालटणार ‘हे’ दोन अष्टपैलू? टोप्ली-पाटीदारच्या जागी झाली संघात एन्ट्री
‘पाजी तुमच्याकडूनच तर शिकलोय…’, माजी विस्फोटक फलंदाज सेहवागने कौतुक करताच शार्दुलचे मन जिंकणारे उत्तर