भारतात जसी इंडियन प्रीमीयर लीग खेळवली जाते, तशी अन्य देशातही त्यांच्या लीग स्पर्धा खेळवल्या जातात. यात बीग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमीयर लीग, द हंड्रेड अशा काही स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये जगभरातील खेळाडू खेळताना दिसतात. मात्र, बीसीसीआय आयपीएलशिवाय बाहेरच्या देशातील स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना खेळण्याची परवानगी देत नाही. याबद्दल आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनने मोठे भाष्य केले आहे.
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना तो म्हणाला की, भारतीय संघात असे खूप खेळाडू आहेत की, ज्यांना इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ आणि इतर अनेक विदेशी फ्रँचायझी टी20 लीगमध्ये खेळायचे आहे.
तो म्हणाला की, “भारतीय खेळाडूंना प्रवास करायला खूप आवडते. तसेच त्यांना नवीन स्थितीबद्दल जाणून घेण्याची देखील इच्छा आहे. त्यांच्या यास्पर्धेत सहभागी होण्यामुळे स्पर्धेलाही खूप फायदा होणार आहे.” यामध्ये मात्र त्याने कोणत्याही भारतीय खेळाडूंची नावे घेतली नाहीत.
यावर्षी इंग्लंडमध्ये फ्रँचायझी आधारित ‘द हंड्रेड’ ही 100 चेंडूची स्पर्धा सुरू होणार आहे. ही स्पर्धा मागील वर्षीच सुरू होणार होती, पण कोरोनामुळे यावर्षी सुरू होणार आहे. मॉर्गन म्हणाला की, “अशा खासगी लीगमध्ये खेळाडूंना खेळण्यापासून रोखण्यासाठी आयसीसीने कोणतेही पाऊल उचलले नाही.”
तसेच त्यांंनी क्रिकेट प्रशासकांना पुढील 10 वर्षांसाठी रोडमॅप तयार करण्याची विनंती केली. तो म्हणाला की, “या मोठ्या लीगमुळे बर्याच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकावे लागत आहे आणि ते आंतरराष्ट्रीय कारकिर्द सोडून या लीग कारकीर्दीत प्रवेश करत आहेत. म्हणून प्रशासनकांनी असा रोडमॅप तयार करावा जेणेकरुन खेळाडूला त्याचे कारकिर्द निवडताना सक्ती करावी लागू नये.”
तसेच तो म्हणाला की, “जेव्हा एखादा संघ दुसऱ्या एखाद्या उत्कृष्ट संघाविरुद्ध खेळणार असतो. परंतु, अशा लीगमुळे आपल्याकडे खेळण्यासाठी सर्वोत्कृष्ट अकरा खेळाडू उपलब्ध नसतात. कारण ते इतर चालू असलेल्या लीगमध्ये व्यस्त असतात. जर हे असेच चालू राहिले तर येत्या काही काळात फ्रेंचाइजी लीग क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मागे टाकेल, याबद्दल आयसीसीने विचार करायला हवा.”
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड वॉर्नरला पडला प्रश्न, क्वारंटाईनमध्ये काय करावे? रोहित शर्माने दिले ‘भन्नाट’ उत्तर
लग्नापूर्वी केलेल्या विधानावर किंग कोहलीची पत्नी अनुष्काची पल्टी? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
आरसीबीच्या हॅशटॅगला चेन्नईची जर्सी! ट्विटरकडून मोठी चूक होताच संघांकडून आल्या ‘या’ प्रतिक्रिया