लुईस एंरिके यांचा बार्सेलोना क्लब सोबतचा करार समाप्त झाला आणि त्यांच्या जागेवर बार्सेलोना क्लबचे नवीन कोच झालेले एर्नस्टो वेल्वर्द यांची नियुक्ती झाली.ते यंदाच्या नवीन सीज़न पासून बार्सेलोनासंघाचे कोच असणार आहेत.
बार्सेलोना संघाचे माजी खेळडू असणारे वल्वर्द यांनी महान खेळाडू जोहॅन क्रिफ यांच्या मार्गदर्शनाखाली १९८८-९० बार्सेलोना संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी कोपा डेल रे आणि युरोपियन कप विनर्स कप जिंकला आहे.
वेल्वर्द यांच्या समोरील मुख्य प्रश्न:
१ – बार्सेलोना संघासाठी विजेतेपदे मिळवणे
बार्सेलोना संघाने यावर्षी आतापर्यंत फक्त कोपा डेल रे चषकावर आपले नाव कोरले आहे. ते ला लिगा मध्ये दुसऱ्या स्थानावर होते तर चॅम्पियन्स ट्रोफीच्या उप उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकले. हा सीज़न बार्सेलोना संघाच्या लौकिकाला साजेसा ठरला नाही. आतापर्यंत कोच म्हणून स्पेन मध्ये एकही विजेतेपद मिळविले नसलेल्या वल्वर्द यांच्या समोर हा मोठा प्रश्न आहे. ते ३० जुलै रोजी रियल माद्रिद संघाविरूध्द इंटरनेशनल चॅम्पियन कपसाठी सामना खेळातील जो न्यू जर्सी यूएसए येथे होणार आहे.
२ – मोठ्या खेळाडूसोबत जुळवून घेणे
लियोनल मेस्सी, नेमार, आंद्रे एनिएस्टा,जेरार्ड पिके, यांसारख्या मोठ्या खेळाडूंना त्यांच्या स्टाइलनुसार खेळ करू दिला पहिजे. त्या खेळाडूंचा मान राखला पहिजे.
३ – मीडिया अटेन्शन
स्वतः अबोल असणाऱ्या वल्वेर्द यांच्या समोर मीडियाशी जुळवून घेणे हा देखील मोठा प्रश्न आहे. बार्सेलोना जगभर खूप प्रसिध्द असल्यामुळे प्रसारमाध्यमांत त्यांची नेहमीच चर्चा असते.
४ – तरुणखेळाडू सोबत चांगले संबंध
वल्वेर्द यांची ही जमेची बाजू आहे. बार्सेलोना संघ त्यांच्या यूथ प्रॉडक्ट असणाऱ्या खेळाडूंना संघात जास्त स्थान आजवर देताना आपण पाहिले असले तरी मागील काही वर्षात यात कमतरता दिसत आहे. सर्जिओ रोबेर्टो आणि राफीन्हो हेच खेळाडू मागील सीज़न मध्ये संघात दिसले नवीन चेहरे संघात स्थान मिळवू शकले नाहीत.