---Advertisement---

Video: नॉन स्ट्राइकचा फलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच खेळपट्टीच्या मध्यात, मग गोलंदाजाचे कृत्य पाहून सर्वच चकीत

Funny-Video
---Advertisement---

युरोपियन क्रिकेट लीग (European cricket league) मागच्या महिन्यापासून खेळली जात आहे आणि चाहत्यांचे या लीगच्या माध्यमांतून चांगलेच मनोरंजन होत आहे. या लीगमध्ये दररोज एका पेक्षा एक व्हिडिओ आणि मजेदार घटना घडत असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर येत आहे, ज्याने चाहत्यांना पोट धरून हासण्यास भाग पाडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

क्रिकेटच्या खेळपट्टीवर अनेकदा पाहिले जाते की, नॉन स्ट्राइकवरील फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच स्क्रीजच्या पुढे निघालेला असतो. या व्हिडिओतही असेच काही घडले आहे, पण गोलंदाजाने चेंडू मात्र हातातून सोडला नाही. व्हिडिओत दिसते की, वेगवान गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावत येतो आणि नॉन स्ट्राइकवरील फलंदाज चेंडू टाकण्याच्या आधीच खेळपट्टीच्या जवळपास आर्ध्यापर्यंत पोहोचलेला असतो. फलंदाजाला खेळपट्टीच्या मध्यात पाहून गोलंदाज अचानक थांबण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे हास्य पाहायला मिळते.

चेंडू न टाकताच गोलंदाज थांबल्यामुळे मैदानात एकप्रकारे गमतीचे वातावरण तयार झाल्याचे दिसते. गोलंदाज जेव्हा त्याच्या रनअपकडे पुन्हा जात असतो, त्यावेळी पंचांसोबत काहीतरी बोलतानाही दिसतो. गोलंदाजाने हा प्रसंग मजेमध्ये घेतला असला, तरी याची दुसरी बाजूही पाहायला मिळू शकत होती. नॉन स्ट्राइक एन्डवरील फलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी क्रीजच्या पुढे निघाल्यामुळे गोलंदाजाकडे त्याला धावबाद करण्याची संधी होती, परंतु त्याने तसे केले नाही आणि खेळाडू वृत्ती दाखवत फलंदाजाला एकप्रकारे जीवदान दिले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मांकडींग संदर्भातील नियमात मोठा बदल केला गेला होता. मांकडींगमुळे मैदानात आतापर्यंत अनेक फलंदाजांनी विकेट्स गमावल्या असल्या, तरी या पद्धतीवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित गेले होते. परंतु क्रिकेटचे नियम बनवणारी आणि त्यामध्ये बदल घडवणारी समिती मेरिलबन क्रिकेट क्लबने (MCC) मांकडींग खेळाडूला बाद करण्याची पूर्णपणे योग्य योग्य पद्धत आहे, असे स्पष्ट केले आहे. तसेच मांकडींग ऐवजी त्याला धावबाद म्हणण्याचा निर्णयही समितीने केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

एसएनबीपी २८वी नेहरु अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा: संबलपूर विद्यापीठाकडून एमजी काशी विद्यापीठाचा पराभव

सामन्यानंतर रोहित अश्विनबाबत म्हणाला ‘असे’ काही; मैदानावरच भावूक झाला दिग्गज फिरकीपटू, व्हिडिओ व्हायरल

केरला ब्लास्टर्स तिसऱ्यांदा फायनलमध्ये; लीग शील्ड विजेत्या जमशेदपूरचे पॅकअप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---