भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा नुकताच डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत सहभागी झाला होता. ज्यामध्ये तो दुसरा क्रमांकावर राहिला. बेल्जियमच्या ब्रुसेल्स येथील किंग बौडौइन स्टेडियममध्ये नीरजचा अंतर फक्त एक सेंटीमीटरने चुकला. आता ब्रुसेल्समधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक अतिशय मनोरंजक दृश्य दिसले. ज्यामध्ये युरोपियन महिला चाहते नीरज चोप्राचा ऑटोग्राफ आणि सेल्फी घेण्यासाठी हताश दिसत होत्या.
व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की नीरज प्रथम युरोपियन मुलींना ऑटोग्राफ देतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या मुली एक एक करून नीरजसोबत सेल्फी घेतात. सेल्फी घेत असताना एक मुलगी नीरजशी बोलते. ज्यामध्ये तिने चक्क त्याचा नंबर विचारू लागते.
नीरजला भेटताना मुली खूप उत्साही दिसत होत्या. यावरून असे दिसून येते की नीरजला भारतासह बाहेरही खूप लाईक केले जाते. पाहा व्हिडिओ
European girls are crazy for Neeraj Chopra 🔥 pic.twitter.com/OI40C8Rmc5
— Johns (@JohnyBravo183) September 16, 2024
ग्रेनेडाचा भालाफेकपटू अँडरसन पीटर्स डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीत चॅम्पियन बनला. पीटर्सने 87.87 मीटरच्या सर्वोत्कृष्ट थ्रोसह विजेतेपद पटकावले. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या नीरज चोप्राने 87.86 मीटरची सर्वोत्तम थ्रो केली. अशाप्रकारे, नीरज डायमंड लीगचे विजेतेपद जिंकण्यापासून फक्त 1 सेंटीमीटर कमी होता.
View this post on Instagram
विशेषत: नीरज चोप्रा डायमंड लीगच्या फायनलमध्ये दुखापतीसह मैदानात उतरला होता. स्पर्धा संपल्यानंतर नीरजने सोशल मीडियावर 2024 च्या हंगामाविषयी बोलताना एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने दुखापतीबद्दल देखील सांगितले. डायमंड लीग फायनलपूर्वी सराव करताना नीरजला दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. मात्र त्यानंतरही नीरजने हार न मानता अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.
हेही वाचा-
8 षटकार आणि विश्वविक्रम; बांग्लादेशविरुद्ध कसोटीत स्टार खेळाडूला इतिहास रचण्याची संधी
काळ्या आणि लाल मातीच्या खेळपट्टीत फरक काय ? चेन्नईत भारत-बांग्लादेश कोणत्या खेळपट्टीवर खेळणार?
“काम अजून बाकी आहे…”, शतकी खेळीनंतर इशान किशनने उघड केले मनसुबे