---Advertisement---

आरसीबीचा खेळ अजून संपला नाही! एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी अशी आहेत समीकरणे, जाणून घ्याच

Smriti-Mandhana
---Advertisement---

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 11वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने आरसीबीला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील आरसीबी संघाने स्पर्धेतील सलग पाचवा सामना गमावला. अशात 5 सामने गमावत आरसीबी गुणतालिकेत शेवटच्या स्थानी कायम राहिले. अशात, चाहत्यांनीही आरसीबीच्या क्वालिफाय करण्याची अपेक्षा सोडली आहे. मात्र, आरसीबी संघ काही समीकरणाद्वारे एलिमिनेटर सामना खेळू शकतो. चला तर त्याबाबत जाणून घेऊयात…

आरसीबी गुणतालिकेत शेवटी
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले पाचही सामने गमावले आहेत. गुणतालिकेतील स्थानाविषयी बोलायचं झालं, तर मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेतील 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यांनी 8 गुणांसह अव्वलस्थान पटकावले आहे.

https://twitter.com/RCBTweets/status/1635332148608786434

तसेच, दिल्ली कॅपिटल्स संघाने 5 पैकी 4 विजय मिळवले आहेत. त्यासह ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. यूपी वॉरियर्झ संघ तिसऱ्या आणि गुजरात जायंट्स संघ चौथ्या स्थानी आहे. आरसीबीने अद्याप एकही विजय न मिळवल्यामुळे ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. खरं तर, गुणतालिकेत अव्वलस्थानी राहणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघात एलिमिनेटर सामना खेळला जाईल.

https://twitter.com/wplt20/status/1635336668986372104

आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम
स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या नेतृत्वातील आरसीबी (RCB) संघात एकापेक्षा एक खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, तरीही संघाला एकही विजय मिळवता आला नाहीये. अशात संघ ‘करो वा मरो’ या स्थितीत पोहोचला आहे. आरसीबीकडे तीन सामने शिल्लक राहिले आहेत. यातील तिन्ही सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागणार आहे, यातील एकही सामना पराभूत झाला, तर त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल.

आरसीबी संघाला विजयासाठी इतरांच्या पराभवाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, समीकरण असे आहे की, इतर संघांच्या पराभवावर आरसीबीला अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई आणि दिल्लीने त्यांच्या आगामी सामन्यात गुजरात आणि यूपी संघाला पराभूत करावे लागेल. यानंतर जेव्हा दिल्ली संघाला मुंबईचा पराभव करावा लागेल, तेव्हाच आरसीबी संघ तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचू शकेल. (even after losing 5 consecutive matches all the routes to qualify are open for royal challengers bangalore know how)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे एवढा पैसा..! ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत 5 क्रिकेटपटू, भारतातील तिघांचा समावेश
‘तू मला लय वाट पाहायला लावलीस…’, मुलाखतीत कोच द्रविड विराटला असे का म्हणाले? पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---