ब्राजीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याने भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहे. सध्या सुरू अससेल्या फीफा विश्वचषक स्पर्धेत नेमारच्या नेतृत्वातील ब्राझील संघ चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र, क्वार्टर फायनल सामन्यात ब्राझील क्रोएशियाकडून पराभूत झाला आणि विश्वचषखातील त्यांचे आव्हान संपले. असे असले तरी, भारतात ब्राझील आणि त्यांचा कर्णधार नेमार यांना जोरदार पाठिंबा मिळाला. नेमारने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून भारतातील केरळचा एक फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहे.
फीफा विश्वचषक 2022 च्या विजेतेपदासाठी ब्राझील प्रमुख दावेदार होता. मात्र, क्वॉर्टर फायनल सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघ बाहेर पडला. फीफा विश्वचषकात भारतीय संघ खेळत नसला, तरी भारतात या स्पर्धेविषयी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसून येते. केरळमध्ये फुटबॉलची आवडच चाहत्यांमध्ये सर्वाधिक आहे. केरळमधील चाहत्यांचे फुटबॉलप्रती असलेले प्रेम यापूर्वीही अनेकदा दिसून आले आहे. या राज्यात फुटबॉलपटूंचे मोठमोठे कट-आउट लावले गेले आहेत. पण यावेळी मात्र केरळच्या चाहत्यांनी फीफावर दाखवलेले प्रेम आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यासारखे होते.
आता नेमार जुनियर (Neymar Junior) यानेदेखील स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून चाहत्यांनी लावलेल्या या कटआउटचे कौतुक केले आहे. नेमारने या पोस्टमध्ये लिहिले की, “जगभरातील सर्व कलाकारांकडून प्रेम मिळत असते. धन्यवाद केरळ, भारत.” नेमारने पोस्ट केलेला एका फॅन अकाउंटवरून घेतला आहे. फोटोत एक व्यक्त नेमारच्या कट-आउटकडे पाहत आहे आणि त्या व्यक्तीच्या खांद्यावर एक लहान मुलगा देखील बसला आहे. फोटो अतिशय सुंदर असून चाहत्यांकडून यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स देखील मिळत आहेत.
अर्जेंटिना संघाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगल संघाचा क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे कोरळमधील लागलेले मोठे कट-आउटसाठी फिफाकडून देखील कौतुक केले गेले. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळवासियांची दखल फीफाने घेतल्यामुळे त्यांचे आभार देखील मानले. विजयन यांनी ट्वीट करत लिहिले की, “केरळ आणि केरळच्या लोकांनी नेहमीच फुटबॉलवर प्रेम केले आहे. खेळाप्रती आमची आवड ओळखल्याबद्दल फीफाचे धन्यवाद.”
https://www.instagram.com/p/CmMyP1KtRvv/?utm_source=ig_web_copy_link
ब्राझीलचे या विश्वचषकातील प्रदर्शन पाहिले, तर त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. संघाने तीन पैकी दोन सामने जिंकून राउंट ऑफ 16 मध्ये स्थान मिळवले. नेमार ग्रुप स्टेजमध्ये दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळू शकला नाही. मात्र, राउंड ऑफ 16 मध्ये त्यांने संघात पुनरागमन करत दक्षिण कोरियाविरुद्ध 4-1 असा विजय मिळवून दिला. क्वॉर्टर फायनल सामन्यात मात्र त्यांना क्रोएशियाकडून 4-2 असा पराभव स्वीकारावा लागला. माध्यमांतील वृत्तांनुसार नेमारचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो, मात्र त्याने स्वतः याविषयी अद्याप कुठलाही खुलासा केला नाहीये. (Even Neymar, moved by the love of Keralites, made a special post to thank them)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला माहीत होतं…!’, पदार्पणाच्या सामन्यात शतक करणाऱ्या अर्जुनचा हा कॉन्फिडेंस की ओव्हर कॉन्फिडेंस?
बांगलादेश पराभवाच्या मार्गावर, भारताला विजयासाठी 4 विकेट्सची गरज