कोरोना व्हायरसचे जगभरातील सावट वाढतच चालले आहे, त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे.
कोविड- १९ या व्हायरसमुळे देशातील लोकांना घरातून बाहेर पडता येत नाही. अशामध्ये हातावर पोट असणाऱ्या करोडो लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे अशा लोकांना मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचाही (MS Dhoni) समावेश आहे.
धोनीने पुण्यातील मुकुल माधव फाऊंडेशन (Mukul Madhav Foundation) या संस्थेला १ लाख रुपयांची मदत केली आहे. परंतु करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक असणाऱ्या धोनीने फक्त १ लाख रुपयांची मदत केल्यामुळे त्याला सोशल मीडियावर तूफान ट्रोल (Troll) करण्यात आले आहे.
भारतात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) शिरकाव झाल्याने महाराष्ट्रातील जवळपास १६७ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.
धोनीने १ लाख रुपये दान केलेली पुण्याची मुकुल माधव फाऊंडेशन ही संस्था पुण्याच्या हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या जेवणाची सोय करते. या संस्थेने १२ लाख ५० हजार रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे १ लाख रुपयांची मदत धोनीने केली आहे.
याव्यतिरिक्त बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) गरजू व्यक्तींना ५० लाख रुपयांचे तांदुळ देण्याची घोषणा केली आहे. याचप्रकारे भारताची जागतिक बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनेही (P.V. Sindhu) १० लाख रुपयांची मदत केली आहे.
जवळपास ८०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असणाऱ्या धोनीने १ लाख रुपयांची मदत केल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले. यावेळी एका चाहत्याने ट्विट केले की, “धोनीकडे ८०० कोटींची संपत्ती आहे. परंतु त्याने फक्त १ लाख रुपयांची मदत केली. असं म्हणतात की तुम्ही जेवढे श्रीमंत होता. तितकेच तुम्ही कंजूस बनता. अशा परिस्थितीत दक्षिण भारतीय अभिनेत्यांना माझा सलाम.”
@PawanKalyan donated 1 cr to PM relief fund and 50cr each to AP AND TS#RamCharan donated 70lakh PM AND AP and TS@urstrulyMahesh 50cr to AP and TS#PRABHAS 4 crore to PM and 50 lakh each to AP and TS@Pvsindhu1 donated 10lakhs. #IndiaBattlesCoronavirus #ChineseVirusCorona #covid
— Thebeeinghuman (@thebeeinghuman) March 27, 2020
दुसऱ्या एका चाहत्याने ट्वीट केले की, “मी धोनीचा चाहता आहे. परंतु त्याने फक्त १ लाख रूपये दान केल्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे.”
https://twitter.com/swapnilbajpai82/status/1243368344377384960
एका चाहत्याने लिहिले की, धोनीने कोविड- १९ च्या लॉकडाऊन परिस्थितीत १०० परिवारांना १४ दिवसांपर्यंत मदद करण्यासाठी १ लाख रुपये दिले आहेत. अशा प्रकारे त्याने एका व्यक्तीच्या हिशोबाने २३ रुपये दिले आहेत.”
Dhoni Donates to Help 100 Poor Families During COVID-19 Lockdown.
Net worth – 800 crore💰💰
Donation – 1 lakhThis is meant to support 100 families for 14 days. 🤔
100 x 14 x 3 meals = 4200 meals. 1,00,000 / 4200 = 23 bucks per meal. 😱😱
Well done MSD. 👍👍
— Knotty Commander (@knottycommander) March 27, 2020
ट्रेंडिंग घडामोडी-
-१०० कसोटी खेळलेले परंतु १०० वनडेही खेळायला न मिळालेले ५ खेळाडू
-५ महान क्रिकेटर जे खेळू शकले नाहीत १०० कसोटी सामने
-मायदेशात परतण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू करतोय लोकांकडून पैसे गोळा