---Advertisement---

‘सतत अदलाबदली केली, नाहीतर मी आज ४९ नव्हे २४९ सामने खेळलो असतो,’ भारतीय फलंदाजाने मांडली व्यथा

On: शुक्रवार, मे 21, 2021 11:44 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. अनेकजण त्यांच्यातील प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात जागाही मिळवतात. परंतु त्यानंतर संघातील आपले स्थान टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान पार करण्यात त्यांना अपयश येते. असे काहीसे भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्यासोबत घडले आहे. ९ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १०० आंतरराष्ट्रीय सामनेही न खेळायला मिळालेल्या उथप्पाने त्यांच्या मनातील गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत.

सतत आपल्या फलंदाजी क्रमात बदल केल्यामुळे आपल्याला अधिक प्रभावशाली कामगिरी करता आली नाही. परिणामत: आपल्याला संघातील स्थान गमवावे लागल्याचे त्याने सांगितले आहे.

एका यूट्यूब चॅनलला बोलताना ३५ वर्षीय उथप्पा म्हणाला की, “माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आकडेवारींवर नजर टाकली तर तुम्हाला ठळकपणे एक बाब जाणवेल. ती अशी की, मी ३ पेक्षा जास्त सामन्यांमध्ये एका क्रमांकावर फलंदाजी केली नाही. दर तिसऱ्या सामन्यानंतर मला नव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले गेले. जर मी एकाच क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर आज मी ४९ च्या जागी १४९ किंवा २४९ सामने खेळलो असतो.”

“त्यावेळी सतत माझ्या फलंदाजी क्रमात बदल करुनही मी आक्षेप घेतला नाही. कारण यामुळे भारतीय संघाला फायदा होत होता. परंतु दुसरीकडे माझी आकडेवारी दिवसेंदिवस खराब होत चालली होती,” असे त्याे पुढे सांगितले.

उथप्पाच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकायची झाली तर, २००६ ते २०१५ या काळात त्याने फक्त ४६ वनडे आणि १३ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १६ सामन्यात सलामीवीराची भूमिका बजावली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ७ वेळा, पाचव्या क्रमांकावर ५ वेळा, सहाव्या क्रमांकावर ६ वेळा आणि सातव्या क्रमांकावर ८ वेळा फलंदाजी केली आहे. अशाप्रकारे कधी त्याला सलामीला, कधी मधल्या फळीत आणि कधी खालच्या फळीत फलंदाजी करावी लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तीन वर्षांपुर्वीच द्रविडला मिळाली होती टीम इंडियाचा महागुरु बनण्याची ऑफर, ‘या’ कारणामुळे दिला होता नकार

“तो रिषभ पंतच आहे, ज्याने भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पोहोवलंय”

कसोटी चॅम्पियनशीप: भारतीय मूळ असलेला न्यूझीलंडचा पठ्ठ्या टीम इंडियासाठी ठरणार डोकेदुखी, केलीत ४ शतके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---