भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावत आहे. भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात रिषभ पंतने मोलाचे योगदान दिले आहे. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला एकहाती सामने जिंकून दिले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले गेल होते. अशातच विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी माजी भारतीय क्रिकेटपटूने रिषभ पंतबद्दल भाष्य केले आहे.
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यापुर्वी माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज सबा करिम यांनी म्हटले की, “मला वाटते रिषभ पंत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी प्रमुख भूमिका बजावेल. आपल्याला हे विसरून चालणार नाही की, रिषभ पंतने भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.”
तसेच ते रिषभचे कौतुक करत पुढे म्हणाले की, “जर मला कोणी विचारले तर मी एकच म्हणेन, रिषभ पंतने भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवले आहे. त्याने फलंदाजीसोबत उत्कृष्ट यष्टीरक्षण देखील केले होते. रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले, तेव्हापासून त्याचे योगदान खूप चांगले आहे. रिषभ पंतमुळेच विराट कोहली पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतो.”
तसेच ते पुढे म्हणाले, “विराटला माहित आहे की, रिषभ पंतच्या रूपात आपल्याकडे विश्वासार्ह फलंदाज आहे. जो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन तुफान फटकेबाजी करू शकतो. तसेच सामना जिंकून देणारी खेळीदेखील खेळू शकतो.”
रिषभ पंतने वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तुफान फटकेबाजी करत भारतीय संघाला २-१ ने मालिका जिंकून देण्यात मोलाची भुमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप: भारतीय मूळ असलेला न्यूझीलंडचा पठ्ठ्या टीम इंडियासाठी ठरणार डोकेदुखी, केलीत ४ शतके
हार्दिक पंड्या विरुद्ध ड्रोनाचार्य; मुंबई इंडियन्सच्या सराव सत्राचा फेरपटका, पाहा न पाहिलेले प्रसंग
भारतासाठी खुशखबर; २.९९च्या इकोनॉमीने विकेट्स घेणारा ‘हा’ इंग्लिश गोलंदाज कसोटी मालिकेला मुकणार!