---Advertisement---

हार्दिक पंड्या विरुद्ध ड्रोनाचार्य; मुंबई इंडियन्सच्या सराव सत्राचा फेरफटका, पाहा न पाहिलेले प्रसंग

On: शुक्रवार, मे 21, 2021 9:17 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित झाल्यानंतर सर्व आयपीएल संघ स्पर्धेदरम्यान झालेले मजेशीर प्रसंग सोशल मीडियावर शेयर करत चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. मुंबई इंडियन्सने देखील नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यात त्यांचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मुंबईच्या सराव सत्राची माहिती ड्रोनद्वारे प्रेक्षकांना देत आहे. यावेळी हार्दिकने संघाच्या सरावासंबंधीच्या अनेक महत्त्वाच्या बाबी शेअर केल्या आहेत. या व्हिडिओ दरम्यान ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव नेटमध्ये आक्रमक शॉट मारताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये हार्दिकने आपल्या अनुभवाविषयी सांगितले. तो म्हणाला की, “मुंबई इंडियन्सच्या सर्व चाहत्यांना माझा नमस्कार. मला माहित नाही की, आपण मला ऐकू शकता की नाही. परंतु आपले मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात स्वागत आहे. पुढे त्याने ड्रोनला ड्रोनाचार्य असे नाव दिले आणि म्हणाला की, ड्रोनाचार्य आपल्या चाहत्यांना मैदानाची फेरी सलग मारून दाखवा.”

आगामी काळात एक भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्यस्त असेल; तेव्हा भारताचा आणखी एक संघ श्रीलंका दौर्‍यावर जात असेल. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन किंवा हार्दिक पांड्या करू शकतात. बीसीसीआयने श्रीलंकेच्या दौर्‍याचे नियोजन केलेले आहे. परंतु कर्णधाराबद्दल अद्याप माहिती दिली गेलेली नाही. श्रेयस अय्यर अद्याप तंदुरुस्त नसल्याचे सूत्रांकडून समजते आहे. अशा परिस्थितीत शिखर धवन किंवा हार्दिक पंड्या या दोघांपैकी कोणालाही कर्णधार म्हणून नियुक्त केले जावू शकते.

दरम्यान हार्दिकच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल विचार केला असता, त्याने भारताकडून 11 कसोटी, 60 वनडे व 48 टी20 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने कसोटीत 532 धावा आणि 17 विकेट्सची कामगिरी केली आहे. तर वनडेत 1267 धावा व 55 विकेट्स आणि टी20त 474 धावा व 41 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतासाठी खुशखबर; २.९९च्या इकोनॉमीने विकेट्स घेणारा ‘हा’ इंग्लिश गोलंदाज कसोटी मालिकेला मुकणार!

मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू बनलाय मच्छीमार, पकडलेत ३ मोठे मासे; बघा खास फोटो

दुर्दैव! ८७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या क्रिकेटरला दोन वेळचं अन्नही मिळेना, आश्विनने ट्विट करत केली मदतीची याचना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---