मुंबई क्रिकेट संघातून दु:खद बातमी पुढे येत आहे. मुंबई संघाच्या दिग्गज यष्टीरक्षकांपैकी एक असलेल्या शरद हजारे यांचे सोमवारी (०८ ऑग्सट) सकाळी राहत्या घरी निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. दीर्घ आजारामुळे अंधेरीतील आपल्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दुर्देवाने त्यांच्या वाढदिवशीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
हजारे (Sharad Hazare) यांनी १९६४ ते १९७७ या काळात मुंबई क्रिकेट संघाचे (Mumbai Cricket Team) प्रतिनिधित्त्व केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर क्रिकेटजगतातून हळहळ व्यक्त (Sharad Hazare Died) केली जात आहे. माजी मुंबईकर फिरकीपटू पद्माकर शिवाळकर ज्यांनी हजारे यांच्यासोबत मुंबई संघाकडून भरपूर क्रिकेट खेळले होते. या शिवाळकर यांनीही हजारेंच्या निधनानंतर शोक व्यक्त करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद खूप साधा माणुस होता. त्याचे यष्टीरक्षणाचे कौशल्य टॉप क्लास होते. त्याचे यष्टीरक्षण कौशल्य नैसर्गिक होते. तो यष्टीमागे इतका चपळ असायचा की, फलंदाज कधी यष्टीचीत झाला हे त्यालाही समजायचे नाही. माझ्यासाठी तो भारताच्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांपैकी एक होता. तो भारतीय कसोटी संघात संधी मिळण्याच्या खूप जवळ होता, पण दुर्दैवाने त्याची इच्छा अपूर्णच राहिली”, असे मिड-डेशी बोलताना शिवाळकर म्हणाले.
मुंबईचे माजी यष्टीरक्षक शरद हजारे यांचे निधन.
१९५८ ते १९७३ या काळातील अजिंक्य मुंबई रणजी संघात त्यांचा समावेश होता.
मुंबई क्रिकेट तर्फे विनम्र आदरांजली! ॐ#MumbaiCricket pic.twitter.com/C7hwvKn5fk
— MumbaiCricket (@cricket_mumbai) August 9, 2022
A stalwart of a glorious era of 60s/70s when Mumbai dominated Indian cricket passed away today:Sharad Hazare kept for Mumbai, played for Hindu Gym when into his 60s,rarely if ever missed a catch or stumping. He had the most precious quality for a quality keeper: soft hands. RIP pic.twitter.com/j5gbVBxmhk
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) August 8, 2022
हजारे हे त्याच परिसरात लहानाचे मोठे झाले होते, जिथे महान भारतीय फलंदाज सुनील गावसकर, मिलिंद रेगे आणि सुधीर नाईक यांचे बालपण गेले होते. रेगे यांनी हजारेंसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ‘तो माझा आणि सुनीलचा आदर्श होते. आम्ही नेहमी त्याचासारखा खेळ करण्यावर जोर द्यायचो.’
मुंबईचे माजी यष्टीरक्षक हजारे यांनी ४४ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. या ४४ सामन्यांपैकी ४६ डावांमध्ये फलंदाजी करताना त्यांनी केवळ ४३८ धावा केल्या होत्या. फलंदाजीत जरी त्यांचे प्रदर्शन सरासरी राहिले असले तरीही, यष्टीरक्षणात त्यांचा कोणी हात पकडू शकत नव्हते. हजारे यांनी प्रथम श्रेणीत यष्टीमागे ११० विकेट्स घेतल्या होत्या. यातील ८१ फलंदाजांना त्यांनी झेलबाद केले होते, तर २९ फलंदाजांना यष्टीचीत केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पत्नीच्या यशाने कार्तिक इमोशनल, ब्रॉन्ज मेडल विजयानंतर ‘या’ शब्दांत केला कौतुकाचा वर्षाव
INDvsPAK: पाकिस्तानचा सूड घेण्यास तयार आहेत भारत! आशिया चषकाच्या प्रोमोत दिसले रोहितचे रौद्ररूप
महिला क्रिकेटमधील चोकर्स ठरतेय टीम इंडिया! दरवेळी मोक्याच्या क्षणी खातायेत कच