प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. या मोसमासाठी सर्वच संघांनी चांगली तयारी केली आहे. मागील मोसमात दबंग दिल्लीला कडून प्रो कबड्डीत पर्दापण करण्याऱ्या नवीन कुमारने चांगलीच छाप सोडली होती.
या मोसमात नवीन कुमार दबंग दिल्लीचा मुख्य रेडर म्हणून आपली भूमिका बाजवताना दिसणार आहे याच पार्श्वभूमीवर महास्पोर्ट्सने घेतलेली नवीन कुमारची घेतलेली ही खास मुलाखत…
प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे, तुमच्या संघाबद्दल काय सांगशिल?
आमचा संघ खूप चांगला आहे. संघात जोगिंदर नरवाल सारखा कर्णधार आहे. आमच्या संघात मागील मोसमात खेळलेले जवळपास सर्व खेळाडू यावर्षीही संघात आहेत. त्यामुळे आम्हाला एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल. आम्ही चांगला सराव केला आहे.
मागील मोसमामध्ये तू एनवायपी(न्यू यंग प्लेयर) म्हणून आला होता, या मोसमातमध्ये मुख्य रेडर असणार आहेस, तर तूला असे वाटते का की तूझी जबाबदारी वाढली आहे ?
मी मागील मोसमात जरी एनवायपी म्हणून आलो असलो तरी माझ्यावर हुड्डा सरांनी जास्त जबाबदारी टाकली होती. माझ्यावर विश्वास टाकला होता आणि मला खेळाण्याची चांगली संधी दिली. मागील मोसमापेक्षा यावर्षी थोडा दबाव जास्त असेल. जबाबदारी जास्त असेल. यावेळी अजून जास्त चांगले खेळू.
प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमात नवा नवीन बघायला मिळेल का?
मागच्या वर्षीचा खेळ पाहुन आमच्या प्रशिक्षकाने आणि ट्रेनरने चांगला सराव करुन घेतला आहे. माझ्या मुव्हजवर काम केले आहे. ट्रेनिंग केली आहे. त्यामुळे असे म्हणू शकतो की यावेळी नवा नवीन पहायला मिळेल.
दबंग दिल्लीच्या कोणत्या खेळाडूकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, असे तूला वाटते ?
कबड्डी हा सांघिक खेळ आहे. मागील मोसमातही आम्ही संघ म्हणून चांगले खेळलो. सर्वांनी त्यांचे योगदान दिले होते. त्यामुळे यावेळीही आम्ही संघ म्हणून खेळू. संघात काही नवीन खेळाडू सामील झाले आहेत. तेही आम्हाला साथ देतील. आमचा पूर्ण संघच चांगला आहे. त्यामुळे सर्वचजण स्टार आहेत.
तूमच्या संघाने या मोसमाआधी फिटनेससाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष दिले आहे ?
आमचा मागील एक-दिड महिना कॅम्प लागला होता. त्यामध्ये आम्ही फिटनेस, जिम ट्रेनिंगवर लक्ष दिले होते. आमच्या ट्रेनरने आमच्याकडून चांगली तयारी करुन घेतली आहे. त्यामुळे आता आमचा सर्व संघ फिट आहे.
तूझ्या कबड्डीची सुरुवात कशी झाली ?
मी भिवानी (हरियाणा) गावातून आलो असून 2011 पासून कबड्डी खेळायला सुरुवात केली. गावात आमच्या सरकारी शाळेत प्रशिक्षक आमच्याकडून सराव करुन घेत होते.
तू कबड्डीमध्ये कोणाला आदर्श मानतो आणि तूझी पुढील स्वप्ने काय आहेत ?
मी अजय ठाकूरला फॉलो करतो. त्याला मी आदर्श मानतो. माझे पुढे हेच स्वप्न आहे की मी आणखी यश मिळवावे आणि भारताकडून खेळावे. मी चांगला सराव करेल. मला चांगली मेहनत घ्यायची आहे.
Cheeteh ki chaal, aur Naveen Kumar ki raids se koi nahi bach sakta. Humaara #DabangExpress aa gaya hai opponents ki batti gul karne, ek baar phir. Cheer our star raider on, in the comments with #DabangDelhi.
💪🤜🔥#DabangSquad #TheEagles #AssiDilli #DilBoleDilli #VivoProKabaddi pic.twitter.com/eqDOPStjo6— Dabang Delhi KC (@DabangDelhiKC) April 14, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–प्रो कबड्डी ७ लेग १: तेलगू टायटन्स विरुद्ध यु मुंबा लढत, सिद्धार्थ देसाईंकडे सर्वांच्या नजरा.
–काय सांगता! या संघाचा प्रशिक्षक कर्णधारापेक्षाही आहे तब्बल ७ वर्षाने लहान
–आज सह्याद्री वाहिनीच्या “महाचर्चा” कार्यक्रमात “गौरव कबड्डीचा” यावर चर्चा.