भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या वडील बनला आहे तसेच त्याने आपल्या मुलाचे नावही ठेवले आहे. असे असले तरीही त्याने आणि त्याची पार्टनर नताशाने आपल्या मुलाच्या नावाची अधिकृतरीत्या पुष्टी केलेली नाही. खरं तर केकवर मुलाचे नाव हे अगस्त्य असे लिहिले होते.
भारतीय संघाच्या सध्याच्या क्रिकेटपटूंच्या मुलांप्रमाणे पंड्यानेही आपल्या मुलाचे हटके नाव ठेवले आहे. हे काही कॉमन नाव नाही, जे प्रत्येक भारतीय गलीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये कोणकोणत्या खेळाडूने आपल्या मुलांचे नाव हटके ठेवले आहे.
शिखर धवन- जोरावर
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनच्या मुलाचे नाव जोरावर आहे. हे नाव धवन या नावापेक्षा गब्बर या निकनेमशी अधिक मिळते जुळते आहे. जोरावर आपल्या वडिलांप्रमाणेच बिंदास्त आहे. आणि धवनचा हा पहिलाच मुलगा आहे. यापूर्वी त्याची पत्नी आयशाला पहिल्या लग्नानंतर २ अपत्य होते. त्या दोन्हीही मुली आहेत. धवनप्रमाणे त्याची पत्नीही नेहमीच आपले आयुष्य बिंदास्तपणे जगण्यात विश्वास ठेवते. मग ती गोष्ट घराबाबत असो किंवा मैदानाबाबत ती आपल्या पती धवनबरोबर प्रत्येकवेळी दिसते.
https://www.instagram.com/p/CANk0HoD-k6/
रोहित शर्मा- समायरा
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने स्पोर्ट्स मॅनेजर असणाऱ्या रितिका सजदेह बरोबर २०१५ मध्ये विवाह केला. त्यानंतर त्यांना ३० डिसेंबर २०१८ ला एक मुलगी झाली. तिचे नाव समायरा असे ठेवले आहे. ती २०१९ च्या आयपीएलदरम्यान रोहित कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सच्या अनेक सामन्यांना रितिकाबरोबर उपस्थित होती.
https://www.instagram.com/p/B_OxYhYjjil/
अजिंक्य रहाणे- आर्या
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या मुलीचे नाव आर्या आहे. आर्याबरोबर त्याने लॉकडाऊनमध्ये खूप वेळ घालविला आहे. आर्या हे सध्या प्रचलित असलेल्या नावांपैकी एक आहे. रहाणेसाठी हा वेळ कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण क्षण घालविण्यासारखे आहे. रहाणेसाठी सर्वात चांगली बातमी अशी की तो आपल्या मुलीसोबत अधिक वेळ घालवत आहे. आर्याचे वय सध्या ९ महिने आहे.
https://www.instagram.com/p/CAFoeWbhkSh/
हरभजन सिंग- हिनाया हीर
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) एका मुलीचा वडील आहे. तसेच हरभजन आणि त्याची पत्नी गीता बसराने आपल्या मुलीचे नाव हिनाया हीर (Hinaya Heer) ठेवले आहे. या नावाचा अर्थ अभिव्यक्ती असा होतो.
https://www.instagram.com/p/B9ihGD2hm8h/?utm_source=ig_web_copy_link
एमएस धोनी- झिवा धोनी
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने ४ जूलै २०१० ला साक्षी रावतबरोबर विवाह केला. साक्षीने ६ फेब्रुवारी २०१५ ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मावेळी धोनी २०१५ च्या विश्वचषकामध्ये व्यस्त होता. त्यामुळे तो जवळजवळ २ महिने त्याच्या नवजात मुलीला भेटला नव्हता. धोनीची (MS Dhoni) मुलगी आपल्या वडिलांप्रमाणेच अगदी स्टायलीश आहे. धोनीने आपल्या लाडक्या मुलीचे नाव झिवा (Ziva) ठेवले आहे. या नावाचा अर्थ प्रशस्त (लक्झरी) असा होतो.
https://www.instagram.com/p/B5E5bqQHvc_/?utm_source=ig_web_copy_link
झिवाचे इस्टाग्रामवर अकाउंटही आहे. या अकाउंटला हजारो फॉलोवर्स आहेत. झिवा अनेकदा आयपीएलवेळी साक्षीसह धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.
मोहम्मद शमी- आयरा
भारताचा वेगवान गोलंदाज शमीला आयरा नावाची लहान मुलगी आहे. तो अनेकदा तिचे डान्स करतानाचे, खेळतानाचे अनेक व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. पत्नीबरोबर सुरु असलेल्या मतभेदांमुळे शमी आपली मुलगी आयरापासून दूर आहे. त्याची मुलगी आयरा आपली आई हसीन जहां सोबत राहते. पण शमी नेहमीच आपल्या मुलीची आठवण काढतो.
https://www.instagram.com/p/B0AmtTlAymE/
सुरेश रैना- ग्रेसिया व रियो
भारतीय संघाचा खेळाडू सुरेश रैनालादेखील (Suresh Raina) एक मुलगी आहे. तिचे नाव त्याने ग्रेसिया (Grecia) असे ठेवले आहे. याचा अर्थ देवाची कृपा असा होतो. २३ मार्च रोजी रैनाला पुत्ररत्न प्राप्त झाले असून त्याचे नाव रियो असे ठेवले आहे. रैनाने जगभरात नाव कमावले आहे, परंतु तिची ४ वर्षांची मुलगी ग्रेसिया सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. ग्रेसियाच्या इंस्टाग्रामवर जवळपास एक लाख फॉलोअर्स आहेत यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. छोट्या ग्रेसियाचे अनेक गोंडस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
https://www.instagram.com/p/CDbkuMjh6sV/
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू सुरेश रैनाने ३ एप्रिल २०१५ रोजी प्रियंका चौधरीसोबत लग्न केले होते. १६ मे २०१६ रोजी ग्रेसियाचा जन्म झाला. त्यानंतर मार्च २०२० ला रैनाला मुलगा झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
-सचिनमुळे क्रिकेट खेळायला केली होती सुरुवात, पुढे झाला देशाचा कर्णधार
-आयपीएल म्हटलं की पाकिस्तानी क्रिकेटरच्या पोटात दुखतं, या माजी क्रिकेटरने केली टीका
-आयपीएलपाठोपाठ विव्होने सोडले आणखी २ टायटल स्पॉन्सरशीप; या २ इव्हेंट्सला बसणार मोठा फटका
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये कशीही कामगिरी केली तरी या ५ खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात संधी नाही
-४ अशी कारणे, ज्यामुळे श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स दुबई जिंकणारचं
-जगातील ३ असे गोलंदाज, ज्यांनी किंग कोहलीला दाखवला आहे सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता