मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार खेळ दाखवत ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा संघ आता गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आला आहे. प्रथम खेळताना राजस्थानने केवळ ९० धावा केल्या होत्या. हे तुटपुंजे लक्ष्य मुंबई संघाने केवळ ९ व्या षटकातच २ गडी गमावून साध्य केले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी सादर केली. विशेषतः जेम्स नीशम आणि नॅथन कुल्टर-नाईल यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि राजस्थानला ९० धावांवर रोखण्यात यश मिळवले. नीशमला ३ विकेट्स मिळाल्या, तर नॅथन कल्टन नाईलला ४ विकेट घेण्यात यश आले.
या सामन्यात राजस्थान प्रत्येक विभागात मुंबईपेक्षा मागे राहिला; तरीही ग्लेन फिलिप्सने मुंबईच्या डावादरम्यान असे काही केले, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
मुंबईच्या डावाच्या ८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याने चेतन सकरीयाला हवेत फटका मारला होता, जो सरळ लेग साईडकडे चौकारासाठी जात होता. प्रत्येकाला वाटत होते की, हा चेंडू चौकार किंवा षटकारांसाठी जाईल. पण फिलिप्सने वेगाने जवळजवळ ५० मीटरपर्यंत धाव घेतली आणि चेंडू सीमारेषा ओलांडेल इतक्यात ग्लेन फिलिप्सने एक जबरदस्त डाइव्ह मारून चेंडू अडवला. फिलिप्सच्या या अद्भुत पराक्रमामुळे सर्वांनाच धक्का बसला. पंचाना हा आधी चौकार वाटला पण फिलिप्सच्या अनोख्या पराक्रमाने या चौकाराचे ३ धावांमध्ये रूपांतर केले.
हार्दिक पंड्या देखील फिलिप्सचा अद्भुत पराक्रम पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या दिशेने पाहू लागला. मात्र, फिलिप्सच्या या पराक्रमाशिवाय राजस्थानचा दुसरा कोणताही खेळाडू या सामन्यात विशेष काही करू शकला नाही.
— No caption needed (@jabjabavas) October 5, 2021
https://twitter.com/sportsgeek090/status/1445431042630848514?s=20
https://twitter.com/RitikAg_/status/1445437901970444296?s=20
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्याच्या गोलंदाजांनी योग्य सिद्ध केला. राजस्थान रॉयल्स संघ ९ गडी गमावून फक्त ९० धावा करू शकला आणि मुंबईने हे लक्ष्य फक्त ८.२ षटकांत दोन गडी गमावून साध्य केले.
फॉर्ममध्ये परतताना मुंबईच्या इशान किशनने २५ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. चेतन साकरियाला आठव्या षटकात दोन षटकार ठोकल्यानंतर त्याने नवव्या षटकात मुस्तफिजुर रहमानला आधी चौकार मारला आणि नंतर षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीची हाव कधीही संपत नाही, त्याला जगात सर्वोत्कृष्ट बनायचंय; माजी सहकाऱ्याने गायले गुणगान
धक्कादायक! आयपीएलमध्ये संधी देण्याच्या नावावर युवा खेळाडूंना लाखोंचा गंडा, मोठमोठी नावे यादीत