दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ डू प्लेसिस मागच्या दोन वर्षांपासून हाताच्या पोराला होणाऱ्या वेदान सहन करत होता. मंगळवारी (29 ऑगस्ट) अखेर त्याला या त्याने या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली. मागच्या मोठ्या काळापासून डू प्लेसिस वेदना कमी करणारे इंजेक्शन घेऊन शस्त्रक्रिया टाकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे अखेर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली.
फाफ डू ब्लेसिस (Faf du Plessis) याला टेनिस एल्बो म्हणजेच हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. मागच्या जवळपास दोन वर्षांपासून हा द्रास दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार सहन करत होता. मात्र कॅरेबियन प्रीमियर लीग 2023 दरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. याबाबत त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एका दिवसापूर्वीच सविस्तर माहिती दिली होती. भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर () देखील अशाच प्रकारच्या दुषापतीला सामोर गेला होता. सचिनने आपल्या कारकिर्दीतील मोठा काळ या दुखापतीचा सामना केला आणि अखेर त्याला देखील शस्त्रक्रिया करावी लागली होती.
दरम्यान, अचानक शस्त्रक्रियेची परिस्थिती उद्भवल्यामुळे डू प्लेसिसला कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीएसच्या चालू हंगामातून माघार घ्यावी लागली. या लीगमध्ये डू प्लेसिस सेंट लुसिया किंग्ज संघाचा नियमित कर्णधार असून त्याच्या दुखापतीमुळे संघाला देखील झटका बसला आहे. सध्या डू प्लेसिसच्या नेतृत्वातील हा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. पण आता दक्षिण आफ्रिकी दिग्गजाने माघार घेतल्यानंतर डू प्लेसिसने सीपीएलच्या राहिलेल्या हंगामात संघाचे नेतृत्व सिकंदर रजा करणार आहे. (Faf du Plessis completes a successful surgery.)
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या टी-20 लीगसाठी स्मृती मंधानाचा नकार! खेळणार मायदेशातील महत्वाची मालिका
आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 ऍक्टिव्ह प्लेअर्स, ‘हा’ भारतीय फिरकीपटू टॉपवर