---Advertisement---

बाबर-रिझवान नाहीतर ‘हा’ पाकिस्तानी फलंदाज ठरू शकतो भारतासाठी सर्वात धोकादायक

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 4:44 PM
pak
---Advertisement---

रविवारी (२४ ऑक्टोबर) संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक जबरदस्त सामना होणार आहे. तसे, हा फक्त स्पर्धेचा साखळी सामना असला तरी, या दोन देशांच्या क्रिकेट चाहत्यांसाठी या सामन्याचे महत्व अंतिम सामन्यापेक्षा कमी नाही. अलीकडील फॉर्म व विश्वचषक आकडेवारी भारतीय संघाच्या बाजूने आहे. मात्र, टी२० मध्ये पाकिस्तान संघाला कोणीही हलक्याय घेऊ शकत नाही.

क्रीडा समीक्षक पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना भारतासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगत आहेत. मात्र, आणखी एक असा फलंदाज आहे ज्यापासून भारतीय संघाला सावध रहावे लागणार आहे. कारण त्याची बॅट चालल्यास भारताच्या मार्गात अडचणी येऊ शकतात. हा डावखुरा फलंदाज म्हणजे फखर झमान होय. चार वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये आयोजित २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत करीत विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तानच्या विजयाचा नायक फखर होता.

फखरने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध फक्त १०६ चेंडूत ११४ धावा केल्या होत्या. फखरने या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार मारले होते. या सामन्यात बाबर आझमनेही ४६ धावा केलेल्या. मात्र, फखर पुढे गेला. त्याच्या पहिल्या शतकाच्या बळावर पाकिस्तानने ५० षटकांत ४ गडी गमावून ३३८ धावांचे मोठे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ ३०.३ षटकांत १५८ धावांत गारद झाला आणि पाकिस्तानने १८० धावांनी सामना जिंकला.

फखर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि ५२ चेंडूत एकूण ९८ धावा केल्या. या दरम्यान तो एकदानाबादही राहिला. पीएसएलमध्येही फखरने १० सामन्यात २८७ धावा केल्या होत्या. फखरने ५३ टी२० मध्ये १३६ च्या स्ट्राईक रेटने १०२१ धावा केल्या आहेत. त्यात ५ अर्धशतकेही समाविष्ट आहेत. अशा स्थितीत विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला या डावखुऱ्या फलंदाजाचे उत्तर शोधावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!

‘आज रात्री, दुबईत…’, आयसीसीकडून भारत वि. पाकिस्तान सामन्याचा प्रोमो शेअर, व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस

हार्दिक गोलंदाजी करणार का? विराटकडून आले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---