पाकिस्तानचा स्टार फलंदाज फखर जमान सध्या चांगले प्रदर्शन करत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने नाबाद 180 धावा कुटल्या. त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यात्याली जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर जमानच्या नावावर एक मोठा विक्रमही झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज विव रिचर्ड्स यांचा मोठा विक्रम जमानने मोडला.
बाबर आझम आणि विव रिचर्ड्सनचा विक्रम मोडीत –
पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिका एकूण पाच सामन्यांची आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये यजमान पाकिस्तान संघाने विजय मिळवला. फखर जमान (Fakhar Zaman) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 3000 धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत बाबर आझम आणि दिग्गज विव रिचर्ड्सन यांना मागे टाकले आहे. जमान या खास यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून बाबर आझम या यादीत चौथ्या आणि विव रिचर्ड्सन पाचव्या क्रमांकावर आहेत.
फखर जमानने अवघ्या 67 वनडे डावांमध्ये 3000 धावा साकारल्या आहेत. बाबर आझमने आपल्या 3000 वनडे धावा पूर्ण करण्यासाठी 68 डाव खेळले होते. रिचर्ड्सनने ही कामगिरी 69 डावांमध्ये केली होती. यादीत दक्षिण आफ्रिका संघाचा माजी फलंदाज हाशिम आमला पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 57 डावांमध्येच 3000 वनडे धावा केल्या होत्या.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 3000 धावा करणारे फलंदाज
हाशिम अमला- 57 डाव
शाई होप- 67 डाव
फखर ज़मां- 67 डाव
बाबार आज़म- 68 डाव
विव रिचर्ड्स- 69 डाव
फखर जमानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
फखर जमानच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने 3 कसोटी, 67 वनडे आणि 76 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 32च्या सरासरीने त्याने 192 धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 49.70च्या सरासरीने 3082 धावा केल्या आहेत. टी-20 प्रकारात त्याने पाकिस्तानसाठी खेळळेल्या 76 सामन्यांमध्ये 21.71च्या सरासरीने 1433 धावा केल्या आहेत. (Fakhar Zaman breaks the record of Babar Azam and Viv Richards for scoring 3000 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेच्या कर्णधारपदासाठी पाकिस्तानातून सल्ला, जडेजाआधी रहाणेला प्राधान्य
“आता अक्षरला दिल्लीचा कर्णधार बनवा”, भारतीय दिग्गजाची वॉर्नरच्या नेतृत्वावर नाराजी