ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. चाहत्यांना त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात.मात्र, या हंगामात त्याने चाहत्यांना निराश केलं आहे. या हंगामात त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं आहे. यातच एका चाहत्याने त्याचा खेळीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्याने मजेशीर उत्तर दिले आहे.
चाहत्याने विचारला प्रश्न
अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही अपयशी ठरला आहे. एका चाहत्याने त्याला सोशल मीडियावर विचारले की, “आम्ही पुढच्या सामन्यात तुझ्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?”
ग्लेन मॅक्सवेलने दिलं मजेशीर उत्तर
चाहत्याचा प्रश्नाला उत्तर देत मॅक्सवेल म्हणाला की, “आम्ही विजयी होण्याचा फार्मुला का बदलू?”
मॅक्सवेलच्या बोलण्याचा मजेशीर उद्देश असा होता की, मी धावा करत नाही तरीही पंजाब सामना जिंकत आहे. त्यामुळे संघ विजयी होण्याच्या मागे हेच एकमेव कारण आहे.

आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलची कामगिरी
या हंगामात मॅक्सवेलला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. या हंगामात खेळलेल्या 10 डावांमध्ये त्याने अनुक्रमे 1, 5, 13*, 11, 11*, 7, 10*, 0, 32 आणि 12 धावा केल्या आहेत.
संघ व्यवस्थापनाने दाखवला विश्वास
आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलला अपयश आले तरीही संघ व्यवस्थापनाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. याच कारणामुळे खराब फॉर्ममध्ये असूनही त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जात आहे. गुणतालिकेत पंजाब सध्या 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-कोलकाता विरुद्ध चेन्नईच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित, कसे ते वाचा
जडेजाने ठोकला शेवटच्या चेंडूवर षटकार आणि सीएसकेने रचला इतिहास
Video : मिस्ट्री स्पिनरच्या जाळ्यात अडकला धोनी; हंगामात दुसऱ्यांदा झाला बोल्ड
ट्रेंडिंग लेख –
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला






