भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज आणि कर्णधार एमएस धोनी याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवताना दिसून आला आहे. तो आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे चाहते त्याला खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात तो खेळताना दिसून येणार आहे. तत्पूर्वी तो आणखी एका सराव सामन्यात खेळताना दिसून आला आहे.
बॉलिवुड स्टार्स आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून रविवारी (२५ जुलै) फुटबॉल खेळण्यासाठी एकत्र आले होते. या सामन्यात सहभागी होण्यासाठी भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंगने देखील हजेरी लावली होती. या सामन्याच्या वेळी रणवीर सिंग आणि एमएस धोनी हे दोघेही खूप मस्ती करताना दिसून आले होते. तसेच ते एकमेकांना मीठी मारताना देखील दिसून आले होते. या दोन्ही स्टार्सचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबईतील बांद्रा स्थित ऑल स्टार फुटबॉल क्लबमध्ये एमएस धोनी आणि रणवीर सिंग हे दोघेही एकाच संघातून खेळताना दिसून आले होते. दोघांनीही हिरव्या रंगाची जर्सी परिधान केली होती. हे दोघेही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानच्या संघातून खेळताना दिसून आले. सामन्यात गोल झाला असताना रणवीर एमएस धोनीला मोठी मारताना दिसतो आहे.(Fan boy moment when Ms Dhoni played football with Ranveer singh)
#RanveerSingh and #MSDhoni were clicked in an awesome mood at the All Stars Football practice this evening. pic.twitter.com/Q5HY5lYPBZ
— Filmfare (@filmfare) July 25, 2021
https://www.instagram.com/p/CRwWEBSqKrX/?utm_medium=copy_link
रणवीर सिंग हा आपल्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखला जातो. तो अनेकदा मस्ती करताना दिसून आला आहे. तर दुसरीकडे एनएस धोनीला कॅप्टनकूल नावाने ओळखले जाते. तो मैदानात असो किंवा मैदानाच्या बाहेर नेहमीच शांत दिसून आला आहे. अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, रणवीर सिंगची पत्नी दीपिका पादुकोण आणि एमएस धोनी यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. परंतु ही गोष्टी त्यांनी कधीही अधिकृतपणे मान्य केली नव्हती. त्यामुळे त्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
महत्त्वाच्या बातम्या-
चित्त्यासारखी चपळता, अचूक निशाणा; संधी मिळताच इशानने शनाकाला केले यष्टीचीत, झाली धोनीची आठवण
जन गन मन… श्रीलंकेत भारताचे राष्ट्रगाण सुरू झाले अन् पठाण बंधूंच्या मुलांनी केलं असं काही
श्रीलंकेत असलेले सूर्यकुमार आणि पृथ्वी धरणार इंग्लंडची वाट, पण कधी? घ्या जाणून