बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं फार जुनं नातं आहे. दोन्ही क्षेत्रातील लोक एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडले गेले आहेत. काही क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे, तर काही बॉलिवूड कलाकार इंडियन प्रीमिअर लीगमधील संघांचे मालक आहेत. तसेच, जेव्हाही भारताचा सामना असतो, तेव्हा कलाकार आवर्जुन सामन्याला हजेरी लावतात. विश्वचषक 2023 स्पर्धेतही हे पाहायला मिळाले. कलाकारांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांना अनेकदा टीव्हीवर दाखवण्यात आले. मात्र, ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रा याला टीव्हीवर दाखवले गेले नाही. अशात नीरज चोप्राचा अपमान झाल्याचे म्हणत चाहते संताप व्यक्त करत आहेत.
नेमकं काय झालं?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याला (INDvsAUS Final) बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी कॅमेरामनने स्टेडिअममध्ये बसलेल्या या कलाकारांचा शोध घेऊन त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यामध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर, मीरा राजपूत, शाहरुख खान, आशा भोसले अशा मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश होता. मात्र, कॅमेरामनचा कॅमेरा कदाचित स्टेडिअममध्ये हजर असलेल्या नीरज चोप्रा याचा शोध घेऊ शकला नाही. त्यामुळे संपूर्ण सामना संपला, पण नीरज काही टीव्हीवर दिसलाच नाही.
चाहत्यांचा संताप
नीरज चोप्रा याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्टेडिअममधील फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “टीम इंडिया, तुमचा आम्हाला अभिमान आहे. ती रात्र आपली नव्हती, पण आम्ही कधीही विसरणार नाही, अशी ही स्पर्धा होती.”
https://twitter.com/Neeraj_chopra1/status/1726603543170429417
नीरजची ही पोस्ट समोर येताच, नेटकऱ्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. यावेळी अनेक चाहत्यांचा संताप (Fans Angry) झाला. एकाने कमेंट करत म्हटले की, “जर नीरज चोप्राने हे पोस्ट केले नसते, तर आपल्याला समजलेच नसते की, देशाचा सर्वोत्तम खेळाडूही तिथे होता. कारण, ज्यांनी रणवीर सिंगला 100 वेळा दाखवले, त्यांनी नीरजला एकदाही दाखवले नाही.”
https://twitter.com/VarunKrRana/status/1726636993952780533
एकाने असंही म्हटलं की, “सामन्यादरम्यान नीरज चोप्रा स्टेडिअममध्ये होता, पण कॅमेरामन बॉलिवूडचे गुटखा खाणारे चेहरे दाखवत राहिला!”
https://twitter.com/sumitsaurabh/status/1726647113847841080
https://twitter.com/rose_k01/status/1726619079916814844
https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1726686185337053376
https://twitter.com/Bhaiologist/status/1726655009381814427
आणखी एकाने लिहिले की, “रणवीर सिंगला तासंतास दाखवण्यात आले. दीपिका पदुकोणला टीव्हीवर तासंतास दाखवण्यात आले. जय शाह, अमित शाह, नरेंद्र मोदी, शाहरुख या सर्वांना अनेकवेळा दाखवण्यात आले, पण नीरज चोप्रा हा भारताचा सध्याचा सर्वात मोठा ऍथलीट टीव्हीवर एकदाही दाखवला गेला नाही. कल्पना करा की, एक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता, जवळपास प्रत्येक गोष्टीत चॅम्पियन आहे, त्याला अशी वागणूक दिली गेली.”
अशाप्रकारे चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सामन्याविषयी बोलायचं झालं, तर या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 10 विकेट्स गमावत 240 धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत पार केले. तसेच, सामना 6 विकेट्सने जिंकत सहाव्यांदा विश्वचषकाचा किताब नावावर केला. (fans angry after India’s biggest athlete Neeraj Chopra was not even shown once on TV during world cup 2023 ind vs aus final)
हेही वाचा-
INDvsAUS: T20 मालिकेतून डच्चू मिळाल्यानंतर चहलची पहिली रिऍक्शन आली समोर, पाहून तुम्हालाही वाटेल वाईट
World Cup Final नंतर वानखेडे स्टेडियम चर्चेत! नरेंद्र मोदी स्टेडियमला झुकते माप देत असल्याचे…