ऑस्ट्रेलिया दौरा मार्च २०२०नंतरचा भारतीय क्रिकेट संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा ठरणार आहे. यासाठी सोमवारी (२६ ऑक्टोबर) खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी निवड समितीवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातही इंडियन प्रिमीयर लीगचा सर्वात यशस्वी संघ म्हणजेच मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना तर चाहत्यांनी धारेवर धरले आहे.
आयपीएलमधील कामगिरी ही जरी भारतीय संघात निवड होण्याचा मार््ग नसला तरी सध्या कोरोनाच्या काळात देशांतील क्रिकेट ठप्प झाले आहे. अशा काळात जर आयपीएलमधील कामगिरी काही खेळाडूंच्या निवडीसाठी घेतली असेल तर हे मुंबई इंडियन्स संघाबरोबर घडताना मात्र दिसले नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंवर दुर्लक्ष करण्यात आल्याचे आरोप चाहत्यांनी बीसीसीआयवर केले आहेत. दुखापतीचे कारण लावत मुंबईचा कर्णधार आणि मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला कोणत्याही संघात स्थान न दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याला नक्की काय दुखापत झाली आहे याचीही माहिती देण्यात आली नाही. यात चाहत्यांबरोबर कित्येक माजी भारतीय क्रिकेटपटूंनीही उडी घेतली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी बीसीसीआयला रोहितला संघात न घेण्यामागचे योग्य कारण चाहत्यांना सांगण्याची मागणी केली आहे. तर मुंबईच धुंरदर सूर्यकुमार यादव यंदाच्या जबरदस्त फॉर्ममुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याविरुद्ध पदार्पण करण्यासाठी पात्र असल्याची सर्वत्र होत होती. पण भारतीय संघ व्यवस्थापणाने त्यालाही संधी दिली नाही. त्यामुळे दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने बीसीसीआयवर निशाना साधला आहे.
एवढेच नव्हे तर, मुंबईचा हुकमी गोलंदाज राहुल चाहरला त्याच्या गतवर्षीच्या आयपीएल प्रदर्शनामुळे भारतीय टी२० संघात स्थान दिले गेले होते. पण केवळ एका सामन्यात अंतिम ११मध्ये संधी दिल्यानंतर त्याला बाहेर बसवण्यात आले. यावऱषीही चहरने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतू याचे फळ त्याला मिळाले नाही.
शिवाय यावर्षी कित्येक सामन्यात मुंबईला एकहाती विजय मिळवून देणारा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन भारतीय टी२० संघाचा प्रबळ दावेदार होता. तरी भारतीय संघ निवडकर्त्यांनी त्याला दुर्लक्षित करुन, या हंगामात निरंतर चांगली खेळी करण्यात अयशस्वी ठरलेल्या संजू सॅमसनची निवड केली.
बीसीसीआयच्या अशा संघ नियुक्तीमागचा त्यांचा हेतु नक्की काय होता? त्यांना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दुर्लक्षित तर करायच नव्हते ना?, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधान आले आहे.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या फॅन्सला ‘ही’ गोष्ट समजणे गरजेचं, माजी क्रिकेटपटूचे संघव्यवस्थापनावर ताशेरे
“जस्टिस फॉर सुर्यकुमार यादव”, टीम इंडियात संधी न मिळाल्याने चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
ट्रेंडिंग लेख-
अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…
वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!
चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे