भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 5 नोव्हेंबर रोजी 32 वा वाढदिवस साजरा करीत आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव जगभरातून होत आहे. आजच्या दिवशी तो सोशल मीडियावरही बहुचर्चित असून त्याचे चाहते त्याचा दूरध्वनी क्रमांक देखील गुगलवर शोधत आहेत.
विराट हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगनंतर सर्वाधिक शतकं आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याला रात्रीपासूनच शुभेच्छा दिल्या जात आहेत. कुटुंबीय, नातलग, मित्रपरिवार, संघसहकारी, भारतीय तसेच परदेशी क्रिकेटपटू, इतर खेळातील खेळाडू, सिनेकलाकार, राजकीय मंडळी अशा सर्वच क्षेत्रातील लोकांकडून कोहलीला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
त्याच्या वाढदिवसा निमित्ताने त्याच्या चाहत्यांनी देखील गुगलवर केवळ फोटो, व्हडिओ नव्हे तर चक्क त्याचा फोन नंबर देखील मोठ्या प्रमाणावर शोधला असल्याचे निदर्शनास आले आहे. गुगल ट्रेंड नुसार त्याचा फोन नंबरही मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आला असल्याचे दिसले आहे.

विराट कोहली केवळ क्रिकेटमध्येच नव्हे तर ‘ब्रैंड एंडोर्समेंट’ मध्ये देखील जगात पुढे आहे. ‘फॉर्ब्स’ च्या 2020 च्या यादी नुसार तो जगातील 100 श्रीमंत खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेला एकमात्र क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
” छक्के-चौके मारते रहो” युवराजच्या ‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीला अनोख्या अंदाजात शुभेच्छा
क्वालिफायर सामन्यापूर्वी नव्या लुकमध्ये दिसला बुमराह, दिल्लीविरुद्ध मैदानात उतरताना…
बेंगलोरचा ‘हा’ स्टार क्रिकेटर फलंदाजांसाठी ठरणार डोकेदुखी, शेवटच्या टप्प्यात…
ट्रेंडिंग लेख –






