इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ३६४ धावा केल्या. यानंतर इंग्लंड संघाने देखील चांगली फलंदाजी करत ३९१ धावा ठोकल्या. ज्यामुळे त्यांना २७ धावांची बढत मिळाली.
दुसऱ्या डावात भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा, भारतीय संघाची सुरुवात खराब राहिली. भारताचे दोन्ही सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. ज्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, विराटने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना निराश केले.
विराटने खेळण्यासाठी चुकीचा शॉट निवडला, ज्यामुळे तो २० च्या धावसंख्येवर बाद झाला. समालोचकांनीदेखील कोहलीच्या या शॉटबद्दल चर्चा केली. यानंतर सोशल मीडियावर चाहते देखील विराटच्या या खेळीवर चांगलेच भडकले.
Waiting for ur 100 Kohli @imVkohli #INDvENG #Virat #ViratKohli pic.twitter.com/y8a2EbFCGC
— jayasurya (@surya_ane_nenu_) August 15, 2021
Wonder how #Virat has so much patience dealing with his sustained patch of bad form while others are dropped after a poor show of 4-5 test matches?! Heights of double standard. #INDvENG
— Bharath Shastry (@bharathshastry) August 15, 2021
https://twitter.com/AshwinGour4/status/1426930437096558597
19 months and 49 innings . #Virat hasn't scored a hundred in international cricket . Average is pretty good though with little more than 41 #INDvENG
— News24sevendays (@news24sevendays) August 15, 2021
Last 49 innings average 41 but all said kohli out of form… That's the standard set by virat in international cricket#Virat @imVkohli https://t.co/B0cioxGFWX pic.twitter.com/NH8oIYPuHR
— Joker Boy (@Jokerboy2O) August 15, 2021
How about @mayankcricket come 2 down in the next test and you take a break! #takeabreak #belikebenstokes #virat pic.twitter.com/UD94crybhT
— J. Harinarayanan (@jharinarayanan) August 15, 2021
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1426939680986079235
तसेच यापूर्वी नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणारा केआरकेने देखील विराटबाबत ट्विट करत त्याला ट्रोल केले आहे.
Dear @BCCI people, I will start watching cricket if you will make @klrahul11 captain. #RohitSharma is also acceptable! But pls remove drama #Virat.
— KRK (@kamaalrkhan) August 14, 2021
दरम्यान, इंग्लंडला २७ धावांची बढत मिळाल्यानंतर, भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला. तेव्हा भारताचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर विराट कोहली देखील फार काळ टिकू शकला नाही. गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नसलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी ४ थ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली.
चौथ्या दिवसानंतर भारतीय संघाची स्थिती दुसऱ्या डावाच १८१ वर ६ विकेट्स अशी होती. भारताला १५४ धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना मार्क वूडने ३ विकेट घेतल्या, तर मोईन अलीला २ विकेट मिळाल्या. तसेच सॅम करनने १ विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
–खुशखबर! इंग्लंड पाठोपाठ आता ‘या’ देशाच्या खेळाडूंनाही मिळाली उर्वरित आयपीएल २०२१ खेळण्याची परवानगी
–Video: भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला उन्मुक्त चंद अमेरिकेतही पदार्पणातच फ्लॉप; ‘असा’ झाला शुन्यावर बाद
–खास वेलकम! क्रिकेटच्या भाषेत पायलटने केले मुंबई इंडियन्सचे शानदार स्वागत, व्हिडिओ जिंकेल तुमचेही मन