इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतीम सामना अगदी 12 दिवसांवर येऊन पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी संघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळते. प्रत्येक संघ स्वत:ला सिद्ध करत अंतीम सामन्याकडे झेप घेतो आहे. दरम्यान, मंगळवारी (16 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊने 5 धावांनी विजय मिळवला आणि गुणलातिकेत तिसरा क्रमांक मिळवला. मात्र, सामन्यादरम्यान कृणाल पांड्याच्या दुखापत झाली. कृणालच्या दुखापतीची चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे. तर चला जाणून घेऊ नेमके प्रकरण आहे तरी काय.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊने 3बाद 177 धावा केल्या. मुंबईपुढे विजयासाठी 178 लक्ष्य होते. प्रत्युत्तरात, मुंबईने 20 षटकांत 5 विकेट्सच्या नुकसानावर 172 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी लखनऊ संघ 5 धावांनी विजयी झाला.
सामन्यावेळी क्रुणालला दुखापत
लखनऊने (Lucknow Super Giants) विजयाची चव चाखली पण संघाचा कर्णधार कृणाल पंड्या (Krunal Pandya) सामन्यावेळीचा एक निर्णय सध्या जोरदार चर्चेत आहे. निकोलस पूरनला लवकर खेळपट्टीवर बोलावण्यासाठी कृणाल रिटायर्ड हर्ट झाल्याचे बोलले जात आहे. या निर्णयावर भारतीय संघातील आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघातील स्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) ट्वीट करत उत्तर दिले.
तर घडले असे की, फलंदाजी करण्यासाठी कृणाल आल्यानंतर 16 व्या षटकांत 42 चेंडूत 49 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. चर्चेचा विषय बनले ते 16 वे षटक, यावेळी धावतांना कृणालच्या पायाला दुखापत झाली. फिजियो खेळपट्टीवर आल्यानंतर कृणालच्या पायाची दुखापत बघत बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा कृणाल बाहेर जाण्यासाठी निघाला तेव्हा तो थोडा डगमगताना दिसला, पण त्याला काही त्रास होत नसल्याप्रमाणे चालू लागला.
अश्विनने केले ट्वीट, बघता बघता झाले व्हायरल
सामन्यावेळी घडलेल्या घटनेमुळे चाहत्यांनी घटनेला खेळाची रणनीती म्हटले आहे. यावेळी ट्वीट करत चाहत्यांनी लिहीले की, क्रुणालने विजय मिळविण्यासाठी चीटिंग केली. या घटनेतील सर्वांत मजेशीर गोष्ट अशी की, दुखापती नंतर जेव्हा तो ड्रेसिंग रुममध्ये जात होता तेव्हा तो पायऱ्या चढताना अगदी सहज रित्या जाताना दिसला. यामुळे आता चाहत्यांमधून क्रुणालला प्रश्न विचारले जात आहेत. दुसरीकडे, स्पिनर रविचंद्रन अश्विनने देखील ट्वीट केले. त्याने असे लिहीले आहे की, ”नियमांनुसार आपल्याला अशी करण्याची परवानगी आहे. ही चीटिंग नाही.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आर्चरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, पीटरसनकडून देशाबाहेरच पैसा कमावण्याचा अजब सल्ला
आशिया चषकाविषयी मोठी बातमी! बांगलादेश-श्रीलंका पाकिस्तानच्या समर्थनात