सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्टपार्क स्टेडियममध्ये (Supersport Park Stadium centurion) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर) २११ धावांची आवश्यकता आहे, तर दक्षिण आफ्रिका संघातील ४ फलंदाज माघारी परतले आहेत. या सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली होती. दरम्यान त्याने केशव महाराजला (keshav Maharaj) बाद करण्यासाठी एक यॉर्कर चेंडू टाकला होता. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
पहिल्या कोसोटी सामन्याचा चौथ्या दिवसापर्यंत दक्षिण आफ्रिका संघाला ४ बाद ९४ धावा करण्यात यश आले आहे. तर सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला ६ गडी बाद करण्याची आवश्यकता असणार आहे. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah Yorker ball) २ फलंदाजांना बाद करत माघारी धाडले होते. त्याने आधी रस्सी वॅन डर डूसेनला बाद करत माघारी धाडले. त्यानंतर त्याने केशव महाराजला वेगवान यॉर्कर चेंडू टाकला आणि त्रिफळाचित करत माघारी धाडले.
चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
जसप्रीत बुमराहने रस्सी वॅन डर डूसेन आणि केशव महाराजला ज्याप्रकारे बाद केले आहे. ते पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी त्याला यॉर्कर किंग बोलायला सुरुवात केली आहे.
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “अप्रतिम यॉर्कर चेंडू! षटक सुरू होण्यापूर्वी विराट कोहली जसप्रीत बुमराहकडे गेला आणि त्याला म्हटले की, ” इथून टाक आता याला बाद करू” त्यानंतर जसप्रीत बुमराहने भन्नाट वेगाने यॉर्कर चेंडु टाकला, जो थेट यष्टीला जाऊन धडकेला.
MEANWHILE : Day 4's கடைசி Ballஅ Keshav Maharajக்கு Yorker போட்டு Bowled எடுத்துட்டு Dean Elgarஓ Bumrahஒரு பார்வை பார்த்தாரு பாருங்க…. Phhhhhaaaaa 🔥🔥🔥 #ThisTimeForAfrica #SAvsIND #Cricanandha @bssportsoffl pic.twitter.com/rbWf1Ewotq
— Cricket Anand 🏏 (@cricanandha) December 29, 2021
https://twitter.com/CricNeuz/status/1476231803773984772?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1476231803773984772%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fsa-vs-ind-1st-test-jasprit-bumrah-threw-a-rocket-yorker-to-the-batsman-the-fans-says-our-yorker-king-2678632
https://twitter.com/ShanuKu39157001/status/1476229787572133891?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1476229787572133891%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fsa-vs-ind-1st-test-jasprit-bumrah-threw-a-rocket-yorker-to-the-batsman-the-fans-says-our-yorker-king-2678632
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने अप्रतिम खेळी करत ५२ धावांची खेळी केली डीन एल्गर हा असा फलंदाज होता ज्याने भारतीय गोलंदाजांचा खंबीरपणे सामना केला. ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात ४ बाद ९४ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवण्यासाठी आणखी २११ धावांची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या :
टीम इंडियासाठी ‘पुढील वरीस मोक्याच’! टी२० विश्वचषकासह खेळणार ‘या’ महत्वाच्या मालिका
नव्या आयसीसी क्रमवारीत अश्विनने उंचावला टीम इंडियाचा झेंडा; रोहित-विराट ‘या’ क्रमांकावर
हे नक्की पाहा : टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं