---Advertisement---

‘त्याच्यावर गांगुलीप्रमाणेच अन्याय’; विराटला कर्णधारपदावरून हटविल्यानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

On: गुरूवार, डिसेंबर 9, 2021 12:18 PM
virat-kohli-captain
---Advertisement---

टी२० विश्वचषक भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळा कर्णधार नेमण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्माला टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. विराट कोहलीने टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आता विराट कोहलीने वनडे कर्णधारपद सोडल्यानंतर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. परंतु विश्वचषक स्पर्धेत भारतीय स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे विराट कोहलीला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी केली जात होती. अखेर बुधवारी (८ डिसेंबर) बीसीसीआयने विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढून रोहित शर्माला वनडे संघाचे देखील कर्णधारपद सोपवले आहे. असे म्हटले जात आहे की, विराट कोहलीने स्वतःहून कर्णधार पदावरून पायउतार व्हावे यासाठी बीसीसीआयने ४८ तास वाट पाहिली. परंतु, विराटने तसे काही केली नाही. त्यानंतर ४९ व्या तासात बीसीसीआयने स्वतः निर्णय घेत रोहित शर्माला ही जबाबदारी दिली.

चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया

विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकल्यानंतर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘विराट कोहलीची कर्णधार पदावरुन हकालपट्टी!! शेवटच्या वेळी हे कधी झाले होते माहीत नाही. कदाचित सौरव गांगुलीसोबत..’

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘सौरव गांगुलीनंतर विराट कोहली एकमेव कर्णधार आहे ज्याची बीसीसीआयने हकालपट्टी केली आहे .’

तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘विराटने जेव्हा टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते त्यावेळी त्याने ट्विट मध्ये म्हटले होते की, त्याने निवडकर्ते आणि रोहितसोबत चर्चा केली आहे. जर त्यांना विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून देखील काढायचे होते,तर त्यांनी त्यावेळीच चर्चा का केली नाही?’

https://twitter.com/firebal_india/status/1468583128935460865?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1468583128935460865%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Futter-disrespect-shame-on-you-twitter-enraged-at-bcci-sourav-ganguly-for-sacking-virat-kohli-as-india-s-odi-captain-101639020446396.html

https://twitter.com/swaris16/status/1468601669290106880?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1468601669290106880%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Futter-disrespect-shame-on-you-twitter-enraged-at-bcci-sourav-ganguly-for-sacking-virat-kohli-as-india-s-odi-captain-101639020446396.html

 

विराटला कर्णधार पदावरून काढल्यानंतर बीसीसीआयने कुठलेही अधिकृत वक्तव्य केले नाहीये. त्यांनी फक्त रोहित शर्माला वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद देण्याचा उल्लेख केला होता. बीसीसीआयने आगामी २०२३ विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करायला सुरुवात केली आहे. विराट कोहलीला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

गेली अनेक वर्ष एमएस धोनीने भारतीय संघाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर एमएस धोनीने विराट कोहलीला कर्णधारपदासाठी तयार केले आणि संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. पुढील २ वर्षात विराट कोहलीने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. मायदेशातच नव्हे तर परदेशात देखील विराट कोहलीच्या नेतृत्वाचा बोलबाला पाहायला मिळाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बिगिनिंग ऑफ हिटमॅन्स एरा’, रोहित भारताच्या वनडे संघाचा नवा कर्णधार बनल्याने ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पूर

धक्कादायक! विराटने स्वत:हून नाही सोडली वनडेची कॅप्टन्सी, बीसीसीआयचे म्हणणे न ऐकल्याने झाली हाकालपट्टी?

असा कर्णधार होणे नाही! विश्वास बसत नसेल तर विराटची ‘ही’ आकडेवारी पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---