दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक कसोटी सामना केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर सुरू आहे. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार विराट कोहली याने डाव सावरला आणि अर्धशतकी खेळी केली. ही खेळी पाहून भारतीय क्रिकेट चाहते भलतेच खुश झाले आहेत. दरम्यान अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या २ वर्षांपासून फलंदाजीमध्ये संघर्ष करताना दिसून येत आहे. त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये झळकावले होते. त्यानंतर त्याला शतक झळकावता आले नाहीये. तो शतक झळकावण्याच्या जवळ पोहोचला, परंतु शतक साजरं करू शकला नाहीये. यावेळी देखील असेच काही झाले, तो ७९ धावा करत माघारी परतला. परंतु, कठीण परिस्थितीत केलेल्या या खेळीचे क्रिकेट चाहत्यांनी कौतुक केले आहे. (Fans reaction on Virat Kohli’s century)
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “कठीण परिस्थितीत भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून महत्वाची अर्धशतकी खेळी. तो भारतीय संघासाठी झुंज देणारी खेळी खेळतोय.” दुसऱ्या एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “विराट कोहलीचे अर्धशतक!! काय अप्रतिम खेळी केलीय विराट कोहलीने.”
तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील विराट कोहलीचे कौतुक करणारे ट्वीट करण्यात आले आहे. त्यांनी लिहिले की, “कर्णधाराची खेळी! कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह आणि अप्रतिमरित्या ऑफ स्टंपच्या बाहेर सोडलेले चेंडू , विराट कोहलीने पूर्ण केले कसोटीतील २८ वे अर्धशतक.” तसेच दिनेश कार्तिकने देखील एक ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.
Well played, Virat Kohli – a fighting knock – 79 runs from 201 balls when there was no support from other end – King lead from front for India. pic.twitter.com/VQ2nbcgffN
— Johns. (@CricCrazyJohns) January 11, 2022
Very crucial fifty from Indian Captain @imVkohli on a very tough conditions. he is playing a fighting innings for team India at the moment. Well done and Keep going KING KOHLI 👑 👌🏻🙌🏻🙌🏻#SAvIND #Virat #Viratkohli #KingKohli @imVkohli @BCCI pic.twitter.com/gXcBb3suKl
— Mayur Shesh (@Mayurshesh33) January 11, 2022
A Captain’s knock! ✊🏻
Cover drives, straight drives and some beautiful leaves outside the off stump later, Virat Kohli gets to his 2️⃣8️⃣th half-century in Tests. 👏🏻👏🏻 #PlayBold #TeamIndia #SAvIND pic.twitter.com/X6LcX7yzKD
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) January 11, 2022
It's very special to see the greatest of talents and stroke makers dig in, play hard and find ways to survive long periods of time to achieve greatness.
Good going @imVkohli 👑#SAvIND #DKommBox pic.twitter.com/VLonyileHe
— DK (@DineshKarthik) January 11, 2022
https://twitter.com/Paribhagat12345/status/1480902759826087936?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1480902759826087936%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Findia-in-south-africa%2Find-v-sa-3rd-test-virat-kohli-completes-50-on-158-balls-second-slowest-fifty-in-test-cricket-for-team-indias-test-captain%2Farticleshow%2F88837682.cms
Just love watching Kohli bat. Test cricket is lucky to have him #SAvIND
— Isa Guha (@isaguha) January 11, 2022
#Kohli deserved a ton after playing exceptionally well. 79 runs from 201 balls without hardly any support from the other end – this innings must rank among his best. #INDvsSA #SAvIND #ViratKohli #CricketTwitter pic.twitter.com/SvEc8TGmB9
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) January 11, 2022
https://twitter.com/smileandraja/status/1480863805638909957
भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. या डावात विराट व्यतिरिक्त भारताच्या एकाही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. केवळ चेतेश्वर पुजाराने ४३ धावांची चांगली झुंज दिली. दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या :
केपटाऊन कसोटीत नाणेफेक जिंकत विराट ‘टॉस का बॉस’च्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी
पाकिस्तान दौऱ्यावर एकटे नाही जाणार ऑस्ट्रेलियन खेळाडू, जाणून घ्या कोण असेल सोबत
हे नक्की पाहा: