इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश संघात 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना होळकर क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यादरम्यान मैदानावर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी बांगलादेशचा क्रिकेटपटू मुशफिकुर रहिमसाठी ‘ 2 रुपये की पेप्सी, रहीम भाई सेक्सी’ अशा घोषणा दिल्या होत्या.
या सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करत असताना रहिम बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करत होता. यावेळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी रहिमला पाहून ‘ 2 रुपये की पेप्सी, रहीम भाई सेक्सी’ अशा घोषणा दिल्या आहेत.
https://twitter.com/ImVpatel/status/1196039915055677440
या सामन्यात भारताने 1 डाव 130 धावांनी विजय मिळवत शानदार कामगिरी केली. मात्र बांगलादेशकडून या सामन्यात निराशाजनक कामगिरी झाली. त्यांच्याकडून केवळ रहिमने फलंदाजी करताना दोन्ही डावात सर्वोत्तम धावा केल्या.
त्याने पहिल्या डावात 43 आणि 64 धावांची खेळी केली. मात्र बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. या सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे भारताने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
बंदीनंतर पृथ्वी शॉचे झाले धडाक्यात पुनरागमन, पण तरीही झाला चाहत्यांकडून ट्रोल
वाचा👉https://t.co/BXMm6Zj4fT👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #prithvishaw— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019
चाहत्याने विचारले, आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल? डेल स्टेन म्हणाला…
वाचा👉https://t.co/f6KLBwDw03👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #IPL2020 #IPLAuction— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019