भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचा सोमवारी (दि.12 डिसेंबर) वाढदिवस होता. यावर्षी युवराजने 41वा जन्मदिन साजरा केला. यावेळी त्याला चाहत्यांनीच नव्हे तर माजी खेळाडूंनी देखील शुभेच्छा दिल्या. यामध्ये मोहम्मद कैफ, इरफान पठान आणि सचिन तेंडूलकर या माजी खेळाडूंचा समावेश आहे.
माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही युवराज सिंग (Yuvraj Singh) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्याला शुभेच्छा देताना गंभीरनेे असे काहीतरी लिहिले ज्याने चाहते चांगेलेच भडकले आणि त्याला चांगलेच ट्रोल केले गेले. युवराजच्या वाढदिवशी गंभीरने ट्वीट करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने ट्वीट करत लिहिले की, “भारताच्या सर्वोत्कृष्ठ व्हाईट बॉल क्रिकेटरला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” त्याच्या या ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून आली.
Happy Birthday to the best white ball cricketer India has ever produced! @YUVSTRONG12 pic.twitter.com/DosQuPOULy
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) December 12, 2022
गंभीरच्या या ट्वीटमुळे चाहत्यांनी त्याला चागंलेच ट्रोल केले. एका चाहत्यांने असे लिहिले की गंभीर कोहली आणि धोनी यांच्यावर जळतोय. तर एक चाहता त्याचे जुने ट्वीट उकरुन काढत म्हणाला की युवराज सिंग आधी गंभीरने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला व्हाईट बॉल क्रिकेटचा सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हटले होतेे. एका चाहत्याने असेही लिहिले की आपण 18424 धावा आणि 154 विकेट घेणाऱ्या खेळाडूला विसरलो आहोत.
टी20 विश्वचषक 2007मध्ये युवराजने आपल्या बॅटने दहशत निर्माण केली होती. त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या 6 चेंडूंवर 6 षटकार मारले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतानेे तो सामना 18 धावांनी जिंकला होता. त्यानंतर 2011च्या विश्वचषकातही युवराजने धमाकेदार प्रदर्शन केले होते. त्याने भारताला 28 वर्षांनी विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. या विश्वचषकानंतर युवराजला कर्करोग असल्याचे समोर आले. त्यानंतर बराच काळ संघाबाहेर राहिल्यानंतर 2019मध्ये त्याने निवृत्ती घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानची इभ्रत पुन्हा चव्हाट्यावर! आयसीसी घालणार आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी?
25 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे पीबीकेजेसीए संघापुढे 317धावाचे आव्हान