आयपीएल २०२२चा हंगाम हळूहळू शेवटाकडे चालला आहे. या हंगामातील ६१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झाला. उभय संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजी निवडली. परंतु हैदराबादच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला.
या सामन्यादरम्यान कोलकाताकडून सलामीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला विशेष खेळी करता आली नाही. स्वस्तात आपली विकेट गमावल्यानंतर तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर (Ajinkya Rahane Trolled) आला आहे.
हैदराबादविरुद्ध (SRH vs KKR) रहाणे वेंकटेश अय्यरसह सलामीला फलंदाजीला आला होता. डावातील दुसऱ्याच षटकात वेंकटेशची विकेट गमावल्यानंतरही त्याने चांगला खेळ दाखवला. आक्रमक पवित्रा हाती घेत त्याने ३ षटकारांच्या मदतीने २८ धावा फटकावल्या. परंतु ही छोटेखानी खेळी केल्यानंतर लगेचच आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर शशांक सिंगच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्वस्तात विकेट गमावल्यानंतरही कोलकाता फ्रँचायजीने एक ट्वीट करत त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. परंतु रहाणेने चाहत्यांची निराशा केल्याने चाहत्यांनी त्याला धारेवर धरले आहे. अनेकांनी त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत त्याला ट्रोल केले आहे. एका चाहत्याने तर त्याला ‘पिल्लू क्रिकेटर’ संबोधले आहे.
@ajinkyarahane88 तुमको टीम से ठीक ही बाहर निकाला गया, तुम कभी नहीं सुधरोगे, तुम पिल्लू क्रिकेटर हो जो सिर्फ़ 20 /30 रन बना पाने लायक रह गया है! छी 🤧
— YADVENDRA GUPTA (@yadvendra30) May 14, 2022
Kuch to sharam karo, pace khelna nahi aata, baki teams Umran ko pit ke chala gaya tum log kya karte ho
— The Sporty Freak (@Sportyfreak2005) May 14, 2022
Come back next year. Bye bye
— Prasun Banerjee (@PrasunB6) May 14, 2022
What rubbish Valiant effort? He should have retired.
— AB1 (@AnfieldBiker1) May 14, 2022
24 pe 28 🤣🤣😂🤡
— Ajeet (@ajeet_kr_MISHRA) May 14, 2022
Such a poor show of batsmanship..As usual all in a hurry to get out early..No basic cricket sense..Dismal coaching..God save English cricket..Venky has always been an over rated player with no footwork at all and Nitish as usual getting out silly after a good start..Bye IPL'22🙏
— Njoy (@8urservice) May 14, 2022
Aakri dum tak Aakhri run tak 💜💜
— Ashish Upadhyaya ACCA (@AshishUP13) May 14, 2022
दरम्यान कोलकाता संघाच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, रहाणेबरोबरच कोलकाताचे इतर फलंदाजही फेल ठरले. मात्र आंद्रे रसेल आणि समॅम बिलिंग्जने संघाचा धावफलक पुढे नेण्यात योगदान दिले. रसेलने २८ चेंडू खेळताना ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावांची झंझावाती खेळी केली. तर बिलिंग्जनेही १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३४ धावा जोडल्या.
या दोघांव्यतिरिक्त कोलकाता संघाचे इतर फलंदाज विशेष खेळी खेळू शकले नाहीत. सलामीवीर वेंकटेश फक्त ७ धावांवर बाद झाला. नितीश राणा (२६ धावा), कर्णधार श्रेयस अय्यर (१५ धावा) आणि रिंकू सिंग (५ धावा) यांनी निराशा केली. कोलकाता संघाला २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १७७ धावा करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSA: आयपीएलदरम्यान होणार बैठक, रोहितच्या अनुपस्थितीत ‘हा’ खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार
आयपीएल मॅच फिक्सिंगच्या आरोपात सीबीआयकडून तिघांना अटक, पाकिस्तानशी आहे कनेक्शन!
जिल्हा फुटबॉल | पुण्याच्या विजयात पूजाची हॅटट्रिक