चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमएस चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात १८० षटकांत ८ बाद ५५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान, इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताचे डीआरएस रिव्ह्यूचे निर्णय चूकल्याचे दिसले. त्यामुळे सध्या भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहली मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.
विशेष म्हणजे भारताने इंग्लंडच्या पहिल्या डावादरम्यान १०८ व्या आणि १०९ व्या अशा दोन सलग षटकात दोन रिव्ह्यू गमावले. झाले असे की १०८ व्या षटकात भारतीय संघाने बेन स्टोक्स ३१ धावांवर खेळत असताना आर अश्विनच्या गोलंदाजीवर पायचीतसाठी अपील केले. मात्र, मैदानावरील पंचांनी नाबाद दिल्यानंतर भारताने रिव्ह्यूची मागणी केली. यामध्ये चेंडू स्टोक्सच्या ग्ल्व्हजला लागलेला दिसला. त्यामुळे त्याला नाबाद दिले.
त्यानंतर लगेचच पुढच्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताने १४७ धावांवर खेळत असलेल्या रुटविरुद्ध नदीमच्या गोलंदाजीवर पायचीतसाठी अपील केले. यावेळीही मैदानावरील पंचांनी नाबाद दिल्याने भारताने रिव्ह्यू घेतला. पण रिव्ह्यूमध्ये रुट नाबाद असल्याचे दिसले.
यानंतर भारताने १३९ व्या षटकात तिसरा आणि शेवटचा रिव्ह्यू देखील गमावला. त्यामुळे चाहत्यांनी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय चूकल्याने भारतीय संघाला आणि विराटला ट्रोल करणे सुरु केले आहे. अनेक चाहत्यांनी यावर मिम्स केले आहेत. एका चाहत्याने एक मिम शेअर करताना ट्विट केले आहे की ‘भारतीय संघ विराटने चूकीचा डीआरएस घेतल्यानंतर म्हणत असेल ‘ये हमारा लडका नही हैं” तर काहीं चाहत्यांनी मैदानावरी पंचांचे योग्य निर्णय देण्याबाबत कौतुक केले आहे.
https://twitter.com/GhasIate/status/1357923107038584832
https://twitter.com/SomewhereNowhe8/status/1357937025819709440
https://twitter.com/__limitlesssss/status/1357965681585655808
https://twitter.com/rakeshfit/status/1357968350853230592
https://twitter.com/Pehla_Nashaa/status/1357968298705444865
https://twitter.com/IamFinisher/status/1357966261540429825
https://twitter.com/TimHamblinShale/status/1357966242104098816
जो रुटचे द्विशतक –
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने द्विशतकी खेळी केली आहे. त्याने ३७७ चेंडूत २१८ धावा केल्या. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच चेन्नई येथे भारताविरुद्ध सुरु असलेला हा सामना रुटचा १०० वा कसोटी सामना असल्याने तो १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याच्याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सनेही ८२ धावांची खेळी केली. त्याआधी डॉम सिब्लीने ८७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत ८ बाद ५५५ धावा करता आल्या आहेत. दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि शहाबाज नदीमने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
खो गए हम कहां! चेंडू उडाला एका दिशेला आणि पंत पळाला भलत्याच दिशेला, पाहा मजेशीर व्हिडिओ





