इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील एलिमिनेटर सामना शुक्रवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने घेतलेल्या एका निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
या सामन्यात विराट सलामीला फलंदाजीसाठी आला होता. मात्र, त्याची ही योजना निष्फळ ठरली आणि अवघ्या 6 धावा करून तो तंबूत परतला. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यानी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे
अंतिम सामन्याचं तिकीट मिळवण्याच्या दृष्टीने या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. या महत्त्वपूर्ण सामन्यात बेंगलोरने प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुभवी सलामीवीर ऍरॉन फिंचला संधी दिली होती. फिंच असतानाही कोहलीने डाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. ट्विटरवर बेंगलोरच्या कर्णधाराच्या या निर्णयावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एवढेच नव्हे, तर त्याला ट्रोलही केले आहे. लोकांनी कोहलीच्या नावाने ट्विटरवर हॅशटॅग थँक्यूविराट हा ट्रेंड सुरु केला आहे.
Tag is Trending…😂😂😂#Thankyouvirat pic.twitter.com/mdBtERnYoV
— Kiran (Ustaad Cult) (@kantre_) November 6, 2020
https://twitter.com/pra_tea_k/status/1324746386911363073?s=20
Someone asked me, "why are you guys trolling Virat Kohli?".
Me –#Thankyouvirat#ThankYouKohli pic.twitter.com/8O7ATuR0xf
— Ministry Of Sarcasm (@M_OfSarcasm) November 6, 2020
https://twitter.com/sambarvada1/status/1324862002502643712
https://twitter.com/iravisbharadwaj/status/1324790716422221829
Anushka – tumne aaj open q kiya
Virat – pic.twitter.com/cXNxrMq7ip
— Dange Tejas (@irony_boi_) November 6, 2020
See you soon @RCBTweets Your return journey has started when Virat came to open the inning.#IPL2020 #SRHvsRCB
— Shubham Borade-Patil (@Shubh1mm) November 6, 2020
1. When you turn on TV to support your former team
2. When you see Virat's gonna open 😂 https://t.co/qntgNGH3R1— Shashank Redemption (@shammma143) November 6, 2020
RCB:- Open Koun Karega?
Virat Kohli :-Main
Pehle Out Koun Hoga?
Virat :- pic.twitter.com/lCgw881Jti— Sairaj S (@_i_am_s_s) November 6, 2020
बेंगलोरने केल्या 131 धावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने 20 षटकांत 7 बाद 131 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीची सलामीला येण्याची योजना अयशस्वी ठरल्यानंतर बेंगलोरकडून अनुभवी फलंदाज एबी डिविलियर्सने डाव सावरला. त्याने बंगलोरकडून सर्वाधिक 56 धावांचे योगदान दिले.
हैदराबादने मिळवला विजय
प्रत्युत्तरादाखल हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी एकही धाव न काढता तंबूत परतला. त्यानंतर युवा फलंदाज मनीष पांडे आणि कर्णधार डेविड वॉर्नरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहाव्या षटकात डेविड वॉर्नरही झेलबाद झाला. त्याने 17 धावांचे योगदान दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला अनुभवी फलंदाज केन विलियम्सनने 50 धावांची नाबाद खेळी केली. त्याने अष्टपैलू जेसन होल्डरसोबत 5 व्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच हैदराबादने हा सामना 6 गडी राखून जिंकला.
हैदराबादचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी
हैदराबादचा पुढील सामना रविवारी (8 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या क्वालिफायर सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
लवकरच भेटू! IPL मधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीचे खास ट्विट
सलग १३ व्या वर्षीही RCB च्या पदरी निराशाच, पाहा काय सांगतो इतिहास
‘नवीन JCB घेण्याच्या विचारात RCB चा मालक’, बेंगलोरच्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा