---Advertisement---

अय्यर नसताना रहाणेच्या हाती दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची धुरा, सोशल मीडियावर मागणीला जोर

On: गुरूवार, मार्च 25, 2021 5:30 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करत असताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याला काही आठवडे मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे वनडे मालिकेला तर तो मुकणारच आहे. तसेच आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी देखील तो संघात नसणार आहे. अशातच दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व कोण करणार? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला काही आठवडे मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. आयपीएल स्पर्धा काही दिवसांवर असताना दिल्ली संघाची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न उपस्थित झाला असताना, ट्विटरवर चाहत्यांनी अजिंक्य रहाणेला कर्णधारपद देण्याची मागणी केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रहाणेने भारतीय संघाला कसोटी मालिका २-१ ने जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच या मागणीने जोर धरला आहे. परंतु रहाणेची आयपीएल २०२० मधील कामगिरी पाहता त्याचे संघात स्थान मिळवणे देखील कठीण झाले आहे. त्याने मागील हंगामात ९ सामन्यात अवघ्या ११३ धावा केल्या होत्या. यात एक अर्धशतकाचा समावेश होता.

आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघ जलद धावा करण्याचा प्रयत्नात असतो. अशातच रहाणेची मागील वर्षाची कामगिरी पाहता त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. त्यामुळे रहाणेला कर्णधारपद मिळणे कठीण दिसून येत आहे.

https://twitter.com/WidesFive/status/1374724328932003842?s=20

या खेळाडूंना मिळू शकते दिल्ली कॅपिटल संघाचे कर्णधारपद

श्रेयस अय्यर संघात नसल्याने दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा फटका बसू शकतो. कारण श्रेयस अय्यर एक चांगला कर्णधारच नव्हे तर मधल्या फळीतील एक उत्कृष्ट फलंदाजदेखील आहे.

दिल्ली संघाने या आयपीएल हंगामात १.५ कोटी खर्च करत स्टीव्ह स्मिथला संघात संधी दिली आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच तो आक्रमक फलंदाजी देखील करू शकतो. यामुळे दिल्ली कॅपिटल संघ स्मिथला कर्णधार पदाची जबाबदारी देऊ शकतात. तसेच आर अश्विनने जर चांगली कामगिरी केली तर, आर अश्विनदेखील कर्णधार पदासाठी प्रबळ दावेदार असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताची ही शॅडो टीम पाहिलीत का? इंग्लंड नाही तर जगातील कोणत्याही क्रिकेट संघाला पाजू शकेल पराभवाचे पाणी!

“सध्याचा भारतीय संघ आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम”, दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराने केले कौतुक

आठवण ‘त्या’ सामन्याची, जेव्हा पाकिस्तानने बलाढ्य इंग्लंडला धूळ चारत उंचावला होता विश्वचषक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---